बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी प्राधिकरण : काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे या संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित काव्योत्सव या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे, लेखिका वंदना ताम्हाणे लिखित काव्यगीता या ग्रंथाचे आणि लेखिका संगीता काळभोर लिखित प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी निगडी पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि संतचित्रकार श्री वि. ग. सातपुते आप्पा हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समरसता साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री अरविंद दोडे हे होते. ज्येष्ठ साहित्यिक श्री. तुकाराम पाटील, कविवर्य सतीश रानडे , कविवर्य आणि चित्रकार श्री शिवाजी सांगळे व काव्यानंद प्रतिष्ठान, पुणेचे उपाध्यक्ष व उद्योजक वैभव मोळक या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. परेश कोळी यांनी गणेश वंदना सादर केली तर कु.भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे चे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचा व प्रकाशित लेखिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन झाले. स्नेहल रेडेकर, कोल्हापूर, स्मिता सराफ, इंदौर, हिमानी बागोरे,वाणी ताकवणे, योगिता कोठेकर, सुहास घुमरे, राणी दबडे, मुंबई, भाग्यश्री मोडक, वर्धा ,दीपाली पवार, सांगली ,पौर्णिमा ढवळे, करमाळा, यशवंत देव, प्रांजल चौधरी, सविता कुंजीर,गौरी काळे, हेमलता शिखरे, मुंबई,वंदना ताम्हाणे, मुंबई ,संगीता काळभोर, मुंबई , पुष्पा पाटणकर, मेहकर , समीर मुल्ला, शिवाजी सांगळे बदलापूर,भावना शिंपी ,परेश कोळी, पनवेल , सोनाली धनमने, चंद्रपूर ,सतीश रानडे, ठाणे यांच्या सह ३३ कवी आणि कवयित्री यांनी कवी संमेलनात सहभाग घेत कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल शेळके, समीर मुल्ला, वंश खंडेलवाल आणि शंतनु सांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले रसिक प्रेक्षक आणि साहित्यिक उपस्थित होते.
काव्योत्सव, काव्यगीता आणि प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन आणि कवी संमेलन
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२३ ०३:१०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२६/२०२३ ०३:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: