महापालिकेच्या विविध प्रकल्पांना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली भेट


 पिंपरी :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी  कासारवाडी आणि गवळीमाथा येथील कचरा स्थानांतर केंद्र तसेच भोसरी तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण या कामांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कामे जलदगतीने करावीत असे निर्देशही संबंधितांना दिले.

कासारवाडी आणि गवळीमाथा येथील प्रकल्पांना भेट दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन सी ए पी) अंतर्गत कासारवाडी आणि गवळीमाथा येथील घरघुती घातक कचरा प्रक्रियेसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रक्रिया केंद्र आणि अमृत २.० या उपक्रमातंर्गत अंतर्गत भोसरी मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणीचा आढावा घेतला तसेच तेथील बांधकाम प्रक्रियेची माहिती घेतली.

या पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत सह शहर अभियंता संजय कुलकर्णीक्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडेउमेश ढाकणेकार्यकारी अभियंता अनिल भालसाखळेआरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच उपअभियंता योगेश आल्हाट उपस्थित होते.

त्यानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी चिखली तसेच जाधववाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रास भेट दिली तसेच चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्राच्या पाहणी दौऱ्यावेळी तेथील स्काडा तंत्रज्ञानाबाबतची माहिती घेतली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान सह शहर अभियंता संजय कुलकर्णीकार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सलउपअभियंता सोहन निकमराजेंद्र मोराणकर उपस्थित होते.



महापालिकेच्या विविध प्रकल्पांना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली भेट  महापालिकेच्या विविध प्रकल्पांना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली भेट Reviewed by ANN news network on ११/०२/२०२३ ०७:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".