पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीसठाण्याच्या पथकाने फ्लिपकार्टच्या डिस्ट्रीब्युशन हबमधून मोबाईल चोरी करणा-या एका डिलेव्हरी बॉय सह एक अन्य तरूण आणि यांना अटक केली असून त्यांचा साथीदार असलेल्या एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे, या सर्वांकडून ५ लाख ९१ हजार २४४ रुपये किमतीचे २४ मोबाईल जप्त करण्यात पथकाला यश आले आहे.
आशिष भाऊसाहेब भोसले, वय २२ वर्षे, राहणार रमाबाई नगर, पिंपरी लिंकरोड, दावत राईस शेजारी, सिमला हॉटेलजवळ, पिंपरी आणि पियुष गोविंद मोहिते, वय २३ वर्षे, राहणार नमो सृष्टी अपार्टमेंट रुम नं. बी / ३०१, गणेश इंटरनॅशनल स्कूलशेजारी, नेवाळेवस्ती, चिखली, पुणे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि., काळेवाडी, पुणे या फ्लिपकार्टच्या हबमधील मॅनेजरने तक्रार दिली आहे.
दसरा दिवाळीच्या दरम्यान फ्लिपकार्टमध्ये 'बिग बिलीयन डे' सेल असताना कंपनीच्या हबमधून ३८ मोबाईल फ़ोन चोरीस गेले होते.त्याबाबतची तक्रार हबमधील मॅनेजरने दिली होती. या तक्रारीवरून वाकड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी डिलेव्हरी बॉय आशिष भोसले व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ८ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. अधिक तपास करता पियुष मोहिते याचे नाव पुढे आले या तिघांकडूनही पोलिसांनी २४ मोबाईल जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
Reviewed by ANN news network
on
११/२७/२०२३ ०८:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: