गल्फ सिनट्रॅक आणि इंडिया बाईक विक २०२३ पुणे मध्ये घेऊन आले 'चाय-पकोडा राइड्स' ची जादू

 


पुणे :  ल्युब्रिकंट्स उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनीगल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडने पुणेमध्ये सादर केली "चाय पकोडाराईडआशिया खंडातील प्रीमियर मोटरसायकलिंग फेस्टिवल म्हणून नावाजल्या जाणाऱ्या इंडिया बाईक वीकच्या इकोसिस्टिममधील एक महत्त्वाची परंपरा आहे "चाय-पकोडाराईडइंडिया बाईक वीकच्या दहाव्या एडिशनची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये चाय पकोडा राइड्सने झाली आणि त्यासोबतच सुरु झाला या वर्षीचामोटरसायकलिंग साहससौहार्द आणि संस्कृतीचा सोहळायंदा गल्फच्या सहयोगाने आयोजित केली जात असलेली ही इव्हेन्ट रायडर्स आणि दर्शकांसाठी अतिशय रोमांचक अनुभव ठरणार आहे.

पुणे चाय-पकोडा ब्रेकफास्ट राईडला प्रचंड प्रतिसाद लाभलाया भागातील तब्बल 1000 पेक्षा जास्त उत्साही रायडर्स यामध्ये सहभागी झाले होतेविविध पार्श्वभूमी असलेले रायडर्स आपल्या वेगवेगळ्या मोटरसायकल्स घेऊन राईडसाठी आलेले होतेयामध्ये गडगडाट करणाऱ्या हार्लेजपासून वेगवान केटीएम आणि यामाहापर्यंत अनेक बाईक्स क्रॅंक इट कॅफे, बावधन पुणे येथे जमा झाल्या होत्यातिथून त्यांनी शीतल दा ढाबा, जुना मुंबई -पुणे महामार्ग, मावळ, लोणावळा र्यंत 54 किमी लांब प्रवासाला सुरुवात केली.

या संपूर्ण इव्हेन्टमध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले होतेप्रत्यक्ष रस्त्यांवर उतरण्याआधी सर्व रजिस्टर्ड बायकर्ससाठी अनिवार्य 'सेफ्टी रायडींगसेशन घेण्यात आलेया राईडमध्ये आयबीडब्ल्यू मार्शल्स देखील होतेज्यांनी रायडर्सच्या एकेक ग्रुप्सचे नेतृत्व केलेत्यामुळे राईडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना इतरांसोबत एकत्र आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता आलाहेल्मेट आणि शूज घालणे प्रत्येक रायडरसाठी अनिवार्य होते आणि गल्फने प्रत्येक रायडरला व्हिजिबिलिटी वाढवणारी फ्लोरोसेंट सेफ्टी जॅकेट्स पुरवली होतीगरज भासल्यास वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवल्या जाव्यात यासाठी एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होतीराईड जिथे संपली त्याठिकाणी सर्व रायडर्सनी पुश-अप आणि बर्पी चॅलेंज यासारख्या साहसी ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला आणि ही राईड अजूनच रोमांचक  संस्मरणीय बनवली.

गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडचे हेड ऑफ मार्केटिंग श्रीअमित घेजी यांनी आयकॉनिक चाय-पकोडा राइड्ससोबत गल्फच्या सहयोगाबाबत अभिमान  आनंद व्यक्त करताना सांगितले"दहाव्या इंडिया बाईक वीकच्या सहयोगाने पुणे मध्ये ही उत्साहवर्धक चाय-पकोडा राईड प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहेया राइड्स मोटरसायकलिंग समुदायाच्या उत्साहाचे प्रतिबिंब आहेतत्यामधून सौहार्दाच्या भावनेला  खुल्या रस्त्यांबाबतच्या प्रेमाला प्रोत्साहन मिळतेदेशभरातील मोटरसायकलप्रेमींसाठी रायडींग अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी गल्फ वचनबद्ध आहे.  आमचा हा सहयोग ही वचनबद्धता दर्शवतोरायडर्सना प्रेरित करणे आणि पाठिंबा देणे हा आमचा उद्देश आहेबायकिंगची आवड पूर्ण करण्याबरोबरीनेच त्यांना सुरक्षित  आनंददायी प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे."

दहावा इंडिया बाईक वीक हा भारतातील मोटरसायकलिंग संस्कृतीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहेइंडिया बाईक वीकचे अतिशय आवडते वैशिष्ट्य चाय-पकोडा राइड्समध्ये रायडर्सना भारतीय चहा आणि भज्यांचा आस्वाद घेता-घेता भारतातील मोहक निसर्गसंपदेचा देखील आनंद घेण्याची संधी मिळते.

गल्फ मोटरसायकलिंग कम्युनिटीप्रती दीर्घकाळापासून वचनबद्ध आहेत्यांच्या नेमक्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यकउच्च दर्जाचे ल्युब्रिकंट्स ही कंपनी पुरवतेइंडिया बाईक वीकच्या सहयोगाने गल्फ बायकर्स आणि राईडप्रेमींना उत्तम अनुभव मिळावासर्वांसाठी मोटरसायकलिंगच्या अनुभवात सुधारणा व्हावी यासाठी उत्सुक आहे.

गल्फ सिनट्रॅक आणि इंडिया बाईक विक २०२३ पुणे मध्ये घेऊन आले 'चाय-पकोडा राइड्स' ची जादू गल्फ सिनट्रॅक आणि इंडिया बाईक विक  २०२३ पुणे मध्ये घेऊन आले  'चाय-पकोडा राइड्स' ची जादू Reviewed by ANN news network on ११/०९/२०२३ १०:४२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".