पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे.त्यांनी आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करावे असे आवाहन केले आहे. तथापि, आज बीड जिल्ह्यात हिंसाचार उफ़ाळला आहे. राजकीय पक्षांची, नेत्यांची कार्यालये, राजकीय नेत्यांशी संबंधित संस्था आणिहॊटेल्स सारखे व्यवसाय यांची आंदोलकांनी जाळपोळ आरंभली असल्याचे वृत्त आहे.
आज माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला आणि त्याखाली उभी असलेली वाहने आज संतप्त जमावाने पेटवून दिली. सोळंके हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत. त्या पाठोपाठ आता बीड येथील राष्ट्रवादीचे कार्यालय संतप्त जमावाने पेटवून दिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या केएसके महाविद्यालयाच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली असल्याचे समजते.धुळेसोलापूर महामार्गावर असलेल्या हॊटेल सनराईझ ला देखील आग लावण्यात आली आहे. हे हॊटेल समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या मालकीचे आहे.
बीड जिल्ह्यात यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाआहे.
Reviewed by ANN news network
on
१०/३०/२०२३ ०८:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: