बदला घेण्याच्या हेतूने खून करणारे दोघे २४ तासात जेरबंद!; चिखली पोलिसांची कामगिरी (VIDEO)

 


पिंपरी : दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी एकाचा खून करणा-या दोघांना चिखली पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करण्यात यश मिळविले आहे.

 सैफुद्दीन खान आणि मोहम्मद अनीस अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कुदळवाडी येथील सिराज अबुल हसन खान हा भंगाराचा व्यवसाय करणारा बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा चुलता  मिजाज अहमद अब्दुल हसन खान याने चिखली पोलीस स्टेशनमध्ये ३० सप्टेंबर रोजी नोंदविली होती.त्याचा तपास चिखली पोलीस करत होते.  या परिसरातील सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी पोलिसांनी केली असता मृत सिराज २८ सप्टेंबर रोजी त्याचा मित्र सैफुद्दीन खान याच्यासमवेत दुचाकीवरून मोशीकडे जाताना दिसून आला. त्यामुळे सैफुद्दीन खान याला चिखली पोलीसांनी ताब्यात घेऊन  त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने खुनाची कबुली दिली. 

दीड-दोन महिन्यांपूर्वी सिराज व सैफुद्दीनमध्ये कंपनीचे भंगार घेण्यावरून वाद झाले होते त्यावेळी सिराजने त्याल दमदाटी करून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या मुलांना मारहाण करण्यासाठी पाठविले होते. त्यामुळे सैफुद्दीन याने मोहम्मद अनिस यास  मुंबईहून बोलावून घेतले.२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सिराज याला सैफ़ुद्दीन याने  भंगार घेण्याचे खोटे कारण सांगून मोटरसायकलवर बसवून च-होलीकडून डी.वाय.पाटील कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या मिलीटरीच्या ताब्यात असलेल्या जंगलात नेऊन त्याच्या डोक्यात हातोडीने घाव घालून त्याचा खून केला व मृतदेह जंगलात टाकला. 

आरोपीने खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता सिराज याच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. 

पोलिसांनी दुसरा आरोपी मोहम्मद अनीस याला मुंबईतून अटक केली. तो उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. 

ही कामगिरी चिखली पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक तौफिक सय्यद,  उपनिरीक्षक बारावकर, सहायक फ़ौजदार ए. डी. मोरे,  हवालदार शिंदे, गर्जे, शिर्के, ताराळकर, सी.डी. सावंत,  साकोरे, नाईक सुतार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांनी केली.


बदला घेण्याच्या हेतूने खून करणारे दोघे २४ तासात जेरबंद!; चिखली पोलिसांची कामगिरी (VIDEO) बदला घेण्याच्या हेतूने खून करणारे दोघे २४ तासात जेरबंद!; चिखली पोलिसांची कामगिरी (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/०३/२०२३ ०३:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".