पिंपरी : इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकणा-या एका तरुणाची ग्रिंडर ॲपवरुन अन्य तरुणांशी ओळख झाली होती. त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून त्याला निर्जनस्थळी नेत त्याच्याशी अनैसर्गिक संभोग केला आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडून २८ हजार ५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावून उकळले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्या तरुणाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे येथील एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेणा-या एका २१ वर्षांच्या तरुणाची ग्रिंडर या डेटींग ॲपवरुन काही तरुणांशी ओळख झाली. त्यांनी त्याला ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून भोसरी एमआयडीसी परिसरात निर्जनस्थळी नेले. तेथे त्याला कोयत्याचा धाक दाखवून २८ हजार ५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला भाग पाडले. त्यानंतर त्याच्याशी अनैसर्गिक संभोग केला. हा प्रकार कोणासही सांगितल्यास तुझी ओळख उघड करू अशी धमकीही दिली.
हा प्रकार घडल्यानंतर त्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२३ ०२:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: