चाकण : एका उद्योजकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याची भिती दाखवत खंडणी मागणा-या एका सात जणांच्या टोळीतील पाचजणांना अटक करण्यात चाकण पोलिसांनी यश मिळविले आहे.
शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, आकाश विनायक भुरे, शुभम युवराज सरवदे, सर्व राहणार. नाणेकरवाडी, जिल्हा पुणे, अजय नंदु होले राहणार हडपसर गाडीतळ, नवनाथ शांताराम बच्छे, कडाचीवाडी , जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. दोन फ़रार गुन्हेगारांचा शोध चालू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २१ सप्टेंबर रोजी राती सवानऊ वाजण्याच्या सुमारास संजय धुलाप्पा कुरूंदवाडे हे त्यांच्या वर्कशॉपमधून मोटारसायकलवरून एकतानगर, चाकण येथील त्यांच्या घरी निधाले होते. सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या मोटारसायकलसमोर रिक्षा आडवी लावून त्यांना मारहाण करून त्याम्चे अपहरण केले. त्यांना लादवड परीसरातील पाईट शिरोली येथे निर्जन ठिकाणी नेऊन१ कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती दिली नाही तर कुरूंदवाडे व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील २० हजार रुपये लुटले. घाबरलेल्या कुरुंदवाडे यांनी दोन दिवसात १२ लाख रुपये आरोपींना देण्याचे मान्य केले. यानंतर त्यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली. आरोपींनी त्यांना खंडणीची रक्कम नाणेकरवाडी येथील आरोग्यम हॉस्पीटल जवळ असलेल्या हिताची एटीएमच्या बाजूला असलेल्या कच-याच्या डब्यात पैसे टाकून निघून जाण्यास सांगीतले. त्याप्रमाणे कुरुंदवाडे यांनी तेथे पसे ठेवले. त्यावेळी पोलिसांनी तेथे सापळा रचला. आणि रक्कम घेण्यासाठी आलेल्या आकाश भुरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम, निरीक्षक गुन्हे युनुस मुलाणी तसेच तपास पथकाचे सहायक निरीक्षक प्रसन्न ज-हाड, विक्रम गायकवाड, फ़ौजदार सुरेश हिंगे, हवालदार राजू जाधव, संदिप सोनवणे, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, नाईक निखील शेटे, कॉन्स्टेबल नितीन गुंजाळ, निखील वर्पे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, ईश्वर गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी, विवेक सानप, माधुरी कचाटे यांनी केली. गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड करीत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०२/२०२३ ११:४१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: