पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावातून मंगळवारी क्लोरीन वायूगळती झाली. यामुळे पोहण्यासाठी आलेले सुमारे २० जण गुदमरले. परिसरातही वायू पसरल्याने जवळ रहात असलेल्या नागरिकांना श्वसनाचा तसेच खोकल्याचा त्रास सुरू झाला. यामुळे जास्त त्रास होत असलेल्या नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी अनेक जण कासारवाडी जलतरण तलावात पोहोण्यासाठी आले होते. त्यावेळी अचानक पोहणारे गुदमरले. सुरक्षारक्षकांनाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जलतरण तलावापासून अर्धा किलोमीटरपर्यंत हा वायू पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला वायूगळती झाल्याचे लक्षात येताच ही बाब अग्निशमनदलाला आणि पोलिसांना कळविण्यात आली. दोन्ही यंत्रणांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नजिकच्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली सुमारे ११ जणांना उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालिका प्रशासन आणि पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२३ ११:४२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: