रुपीनगर, तळवडेतील वीज समस्या सुटणार!

 


 नवीन डीपी, ट्रान्सफार्मरसह प्रकल्पांचे लोकार्पण

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये वीज समस्या सोडवण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुशंगाने रुपीनगर, तळवडे भागातील डीपी, ट्रानफॉर्मरसह अन्य प्रकल्पांचे महावितरणच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले. 

जुन्या डीपी आणि ट्रान्सफॉर्मर सातत्याने तांत्रिक बिगड होत होता. परिणामी नागरिकांना खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी नवीन डीपी आणि ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची खंडित वीज पुरवठयापासून सुटका होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, अस्मिता भालेकर, मा. स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, निलेश भालेकर, शीतल वर्णेकर, बंडू भालेकर, दत्तू नखाते, बाबू भालेकर, रामदास मोरे, रमेश  भालेकर, रमेश बाठे, मुन्ना पवार, सोमनाथ मेमाणे, गजानन वाघमोडे, किरण पाटील, शरद भालेकर, रामदास कुटे, दादा सातपुते, रवी शेतसंधी, रोहन भाते, पंकज आवटे, बाजीराव भालेकर, कैलास भालेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

महावितरणकडे यशस्वी पाठपुरावा… 

भोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले  आहे. यामध्ये देवी इंद्रायणी प्रवेशद्वाराजवळ 630 केव्हीचा, जुना आळंदी रोड संकेत भालेकर यांच्या घराशेजारी 315 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवला आहे. या बरोबरच के. एन. बी. चौकात 630 केव्ही, सोनवणे वस्तीत 315 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. अरविंद इंडस्ट्री येथे 315 केव्हीचा बसविण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे ट्रान्सफॉर्मर बदलून देण्याची मागणी नागरिक करत होते. त्याची दखल घेत आमदार महेश लांडगे यांनी शासकीय स्तरावर, महावितरणकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले.


भोसरी विधानसभा मतदार संघातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही कायम प्राधान्य दिले आहे. मतदार संघातील वीज पुरवठा यंत्रणा सुमारे ३० वर्षे जुनी असल्यामुळे वाढती लोकसंख्या आणि वीज ग्राहकांची मागणी याचे प्रमाण मोठे असल्यामुळे वीज समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात इन्फ्रास्ट्रक्चर सक्षम करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे नागरिकांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास आहे. 

- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.



रुपीनगर, तळवडेतील वीज समस्या सुटणार! रुपीनगर, तळवडेतील वीज समस्या सुटणार! Reviewed by ANN news network on १०/१०/२०२३ १२:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".