भोसरी ; कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्र पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी 02 सुवर्णपदक मिळविले व 01 रौप्य पदक व 2 कास्यंपदक मिळवित उज्ज्वल यश संपादन केले. त्यामध्ये 19 वर्षाखालील मुलांच्या गटात सौरभ जाधव (बारावी कला) या विद्यार्थी खेळाडूने फ्रीस्टाइल या कुस्ती क्रीडा प्रकारात 92 किलोग्रॅम वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला व यश मोरे (बारावी वाणिज्य) या विद्यार्थी खेळाडूंनी ग्रीको रोमन या क्रीडा प्रकारात 77 किलोग्रॅम वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. किशोर भोसले (बारावी वाणिज्य) या विद्यार्थी खेळाडूंने 63 किलोग्रॅम वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला. तर आदिती दौंडकर (अकरावी वाणिज्य) या विद्यार्थी खेळाडूंनी 65 किलोग्रम वजन गटात तृतीय क्रमांक मिळवला तसेच सिद्धांत दराडे या विद्यार्थी खेळाडूंनी 67 किलोग्रॅम वजन गटात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश मिळविले.या शालेय विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धेतून सौरभ जाधव व यश मोरे या दोन खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२३ ०९:३२:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: