पिंपरी : ताथवडे परिसरात असलेल्या जे. एस. पी. एम. कॉलेज परिसरात काल रात्री साडेअकराच्या सुमारास बेकायदेशीरपणे गॅसटँकरमधून सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना आग लागून गॅससिलेंडरचे स्फ़ोट झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर; एकजण पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महिपाल चौधरी, रा. साई पॅराडाईज सोसा. पुनावळे, राहुलकुमार राजदेवराम, रा. बेलठीका नगर, थेरगाव, पुणे, चंद्रकांत महादेव सपकाळ, रा. जे. एस. पी. एम कॉलेज जवळ, ताथवडे, पुणे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भारत माने यांनी तक्रार दिली असून त्यावरून आरोपींविरोधात वाकड पोलीसठाण्यात ९८०/२०२३ क्रमांकाने भा.दं.वि. कलम ३७९,४०७,२८५,३३६,४२७, ३४ व जिवनावश्यक वस्तु अधिनीयम कलम ३,७ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०९/२०२३ ०४:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: