ट्रेडर्सना सक्षम करण्यासाठी 'ट्रेडजिनी'तर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन

 


 

पुणे : गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण आणि चांगले ट्रेडिंग निर्णय घेण्यास व्हावी या हेतूने 'ट्रेडजिनी' या तंत्रज्ञान-आधारित डिस्काउंट ब्रोकिंग फर्मने पुण्यामध्ये एक विशेष कार्यशाळा नुकतीच आयोजित केली. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना डेटा-चलित स्वरुपाची माहिती देण्यात आलीतसेच वास्तविक जीवनातील काही अनुभवांवर आधारीत कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला. 'सेबी'च्या जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाच्या अनुषंगाने ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

शेअरबाजारातील व्यवहारांबाबत शिक्षित करणेकंपन्यांचे आर्थिक अहवालगुंतवणुकीच्या निर्णयांची प्रक्रिया तसेच संबंधित जोखीम या बाबी समजावून सांगणेशेअर बाजाराचे विश्लेषण करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व मूलभूत तत्त्वे यांचे मार्गदर्शन करणे आणि वास्तविक जीवनातील अडचणी  दिग्गजांच्या यशोगाथा याचा उहापोह करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते.

 

ज्ञानवर्धक सत्र' (नॉलेज बूस्ट सेशन) असे नाव असणाऱी ही कार्यशाळा सिनेट बिझनेस सेंटर अँड को-वर्किंग स्पेस येथे पार पडलीविविध क्षेत्रातील शंभराहून अधिकजण यावेळी उपस्थित होते. आर्थिक अहवालांचे वाचनचक्रवाढीची शक्ती आणि तांत्रिक विश्लेषण या तीन प्रमुख विषयांवर या कार्यशाळेत प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले. त्यांमध्ये वय वर्षे २२ असलेला ट्रेडर४५ वर्षे वयाचा गुंतवणूकदार अशा विविध श्रेणीतील नागरिकांचातसेच देशभरातील नामवंत वक्त्यांचा समावेश होता. कार्यशाळेत प्रश्नोत्तराचे एक सत्रही घेण्यात आले. त्यात सर्व सहभागींच्या प्रश्नांची बारकाईने उत्तरे देण्यात आली.

 

ट्रेडर्समध्ये जागरुकता वाढवण्यासाठी आयोजित झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेविषयी आणखी माहिती देताना 'ट्रेडजिनी'चे मुख्य कार्यान्वयन अधिकारी त्रिवेश डी म्हणाले, “आर्थिक साक्षरता ही एक अशी गुरुकिल्ली आहे, जी आर्थिक स्वातंत्र्याचे दरवाजे उघडतेतसेच व्यक्तींना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास व सुरक्षित भविष्य घडवण्यास सक्षम करते. अशा ज्ञानसत्रांच्या आयोजनातून आम्ही जागरूकता वाढवू शकतोत्याचबरोबर महत्त्वाकांक्षी ट्रेडर्सना ट्रेडिंगसाठीची आवश्यक कौशल्ये शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो. गुंतवणूकीचे माहितीपूर्ण निर्णय घेण्याकरीता त्यांना सुसज्ज करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो."

 

सर्व आवश्यक डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्लॅटफॉर्म वापरून माहितीपूर्ण निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे, हे लोकांना ट्रेडजिनीतर्फे या कार्यशाळेत सांगण्यात आले. शेअर बाजारातील व्यवहार आणि गुंतवणूक यांचा परिचय त्यांना करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. भारतातील प्रमुख शहरांमध्ये पुढील दोन महिन्यांत अशी आणखी सत्रे आयोजित करण्याचे 'ट्रेडजिनी'चे नियोजन आहे.

ट्रेडर्सना सक्षम करण्यासाठी 'ट्रेडजिनी'तर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन ट्रेडर्सना सक्षम करण्यासाठी 'ट्रेडजिनी'तर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन Reviewed by ANN news network on १०/०९/२०२३ ०२:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".