पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी, चिखली परिसरात गुरांच्या गोठ्यात शिरून तेथे असलेल्या गुरांशी अनैसर्गिक संभोग करणा-या एका विकृत परप्रांतियाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.
रामकिशन श्रीरामभवन चौहाण (वय २४, सध्या रा. जाधववाडी, चिखली मूळगाव राणीपूर, महाराजगंज, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील एका पशुपालकाच्या गोठ्यातील एका पशूचे पाय बांधलेले मालकाला आढळले होते. तीन वेळा हा प्रकार घडला. त्यामुळे रात्री कोणीतरी गोठ्यात येऊन जात असल्याचा संशय त्याला आला. त्यामुळे त्याने गोठ्यात सीसीटीव्ही लावले. दि. ३ रोजी गोठ्यातील लाईट बंद झाल्याचे गोठ्याजवळ राहणा-या लोकांनी गोठामालकाला कळविले. त्यानंतर गोठामालकाने तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली असता गोठ्याला आतून कडी लावण्यात आली असल्याचे त्याला दिसले. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग ज्या मोबाईलमध्ये होत होते त्याची पाहणी केली असता आरोपी गोठ्यात शिरत असल्याचे तसेच. आत गेल्यावर त्याने एका पशूला काठीने बेदम मारहाण करून त्याचे पाय बांधून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दिसून आले. गोठामालकाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. अशाचप्रकारे अन्य काही गोठ्यांध्येही त्याने हे किळसवाणे कृत्य केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चिखली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२३ ०४:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: