चार गुन्हेगारांना अटक; ५ पिस्तुले जप्त!

 


 पिंपरी  :  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने ०४ सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून ५ पिस्तुले आणि १० गोळ्या जप्त केल्या आहेत.

अस्लम अहमद शेख राहणार थेरगाव, पुणे, सचिन उत्तम महाजन, राहणार. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे,  संतोष विनायक नातू राहणार चिंतामणी बिल्डींग, स्वारगेट, पुणे. आणि राहुल ऊर्फ खंडू गणपत ढवळे राहणार पिंपळगाव ता.दौंड जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून ५ पिस्तुले आणि १० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपी सचिन महाजन, संतोष नातू व राहुल ढवळे हे दाखलेबाज गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहे्त. सचिन महाजन याच्यावर पुणे ग्रामीण येथे मोका कायद्याखाली  कारवाई झालेली आहे. तसेच संतोष नातू याच्यावर पुणे शहर येथे तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.

या आरोपींना मोठ्या शिताफ़ीने अटक करण्याची कामगिरी  वरिष्ठ निरीक्षक  अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी विजय नलगे, 'सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश भावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस प्रदीप गुट्टे व भरत गाडे यांनी केली आहे.


चार गुन्हेगारांना अटक; ५ पिस्तुले जप्त! चार गुन्हेगारांना अटक; ५ पिस्तुले जप्त! Reviewed by ANN news network on १०/०२/२०२३ ०८:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".