लोकशाहीची मोडतोड हे महासंकट ठरेल : पी. साईनाथ

 


वर्तमान परिस्थिती आणि आव्हाने ' व्याख्यानास प्रतिसाद 

पुणे :शेतीची वाताहत, कोविड, आर्थिक विषमता ही भारतासाठी महासंकटे होती, येत्या काळात लोकशाहीची मोडतोड हे महासंकट ठरणार आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांची प्रेरणा घेवून नवा लढा द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी आज सायंकाळी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमीत्त आयोजित 'वर्तमान परिस्थिती आणि आव्हाने' या विषयावरील ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संदिप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे उपस्थित होते.

हे व्याख्यान गांधी भवन कोथरूड येथे झाले.

पी साईनाथ म्हणाले,' शेतीची वाताहत, आर्थिक विषमता आणि लोकशाहीची मोडतोड या तीन प्रकारच्या महा संकटांचा, महामारीचा अभ्यास केला तर वर्तमान परिस्थितीचा अंदाज मांडता येतो. कोविड साथीत गेलेल्या बळींची संख्या कधीच बाहेर आली नाही. गावी परतणाऱ्या मजुरांची काळजी घेतली गेली नाही. त्यातून नवे अब्जोपती मात्र निर्माण झाले.

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मानवी संस्कृती पुढील सर्वात मोठी समस्या आहे. आर्थिक विषमता,असमानता हे दुसरे संकट आहे. मूठभर श्रीमंतांच्या हातात भारताची संपत्ती एकवटली आहे. कोविड साथीच्या काळात देशात अब्जोपती वाढले आहेत.१९९१ मध्ये भारतात डॉलर च्या परिभाषेतील अब्जोपती एकही नव्हता.आता देशात १६० अब्जोपती आहेत . हा जनतेची लूट करून मिळवलेला पैसा आहे.

कोविडनंतर आर्थिक विषमता वाढत असताना आपण डोळेझाक करत आहोत, हा खरा चिंतेचा विषय आहे. माध्यमे देखिल या विषयी लिहित नाहीत. राजा नग्न आहे, असे सांगणारा बालक हा माझा पत्रकारितेचा आदर्श आहे.लोकशाहीला संपविणे , मोडतोड करणे हे तिसरे महासंकट ठरणार आहे.

खलिस्तानचा  आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे. छापे वाढणार आहेत, दहशत वाढवली जाणार आहे. त्यातून लोकशाहीची मोडतोड झाली तर ते महा संकट ठरणार आहे. लोकशाही वाचविणे हे सर्वांसाठी आव्हान ठरणार आहे. शेतकरी आंदोलन हा आशेचा किरण ठरला, त्यातून भारतीय संघरचनेचे , सामान्य जनतेचे रक्षण झाले. हाच धागा घेवून पुढे लढावे लागणार आहे.

डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले, काहींना नागरिक नको आहेत, तर  अंध भक्त हवे आहेत. अंधपणे मतदान करावे असे त्यांचे नियोजन आहे. अशा काळात विवेक शक्तीने हुकूमशाही चा विरोध केला पाहिजे आणि हरवले पाहिजे.

अन्वर राजन, उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडीया, डॉ.प्रविण सप्तर्षी , सचिन पांडूळे, किरण कदम, विवेक काशीकर,सुदर्शन चखाले, पांडुरंग तावरे यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते

लोकशाहीची मोडतोड हे महासंकट ठरेल : पी. साईनाथ लोकशाहीची मोडतोड हे महासंकट ठरेल : पी. साईनाथ Reviewed by ANN news network on १०/०६/२०२३ ०९:३१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".