नवी दिल्ली : येथील भारत मंडप प्रगती मैदान येथे कर्मयोगी मिशन अंतर्गत कॅपसिटी बिल्डिंग कमिशनने पुणे महानगरपालिकेच्या Annual Capacity Building Plan चे प्रकाशन हरदीप सिंग पुरी केंद्रीय मंत्री आवास आणि शहरी कार्ये यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी विक्रम कुमार महापालिका आयुक्त यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या वेळी पुणे महानगरपालिका मार्फत चालू असलेल्या प्रशिक्षण विषयक कामकाजाचे सादरीकरण केले आणि पॅनल डिस्कशन मध्येही सहभाग घेतला. पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत मागील सहा महिन्यात तीन हजार पाचशे अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध विषयांवर प्रशिक्षित केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आय गॉट या पोर्टल वर प्रशिक्षण साठी ४१६ अधिकारी आणि कर्मचारी यांची नोंदणी झाली आहे.
सन २०२३-२४ या वर्षात वर्ग १ ते वर्ग ३ अधिकारी-कर्मचारी यांचे आपण
प्रत्येकी किमान ३ प्रशिक्षणे ही क्लासरूम मध्ये (ऑफलाईन) आणि १२ प्रशिक्षणे iGot पोर्टल
वर (ऑनलाईन) करण्याचे नियोजन महापालिका प्रशिक्षण प्रबोधिनीचे आहे. यावेळी दिल्ली येथे
राजीव नंदकर उप आयुक्त प्रशिक्षण प्रबोधिनी आणि राहुल जगताप सिस्टीम मॅनेजर यांची उपस्थिती
होती.
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२३ ०५:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: