पुणे : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयामधील माहिती -तंत्रज्ञान आणि संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे 'इंट्रोडक्शन टू ब्लॉकचेन ,डीसेंट्रलाइज फायनान्स ' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .'लाईव्ह ब्लॉकचेन नेटवर्क' या विषयावर प्रत्यक्ष अनुभव देणारे सत्रही आयोजित करण्यात आले होते.कार्यशाळेचे उद्घाटन 'मीटर' या सॉफ्टवेअर कंपनीचे व्यवस्थापक सुरजसिंह गायकवाड ,भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहनी,फॅकल्टी कॉर्डिनेटर डॉ.एस.एच.पाटील,डॉ.रोहिणी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये झाले.
या कार्यशाळेमध्ये २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना सुरजसिंह गायकवाड म्हणाले,'सर्व क्षेत्रातील विस्तार पाहता ब्लॉकचेन इकोसिस्टीम ला तरुण आणि कल्पक बुद्धीमान व्यक्तींची आवश्यकता आहे.त्यामुळे 'मीटर कॉलेजीएट पार्टनरशिप प्रोग्रॅम' सुरू करण्यात आला असून त्यामुळे या क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होईल'.डॉ.विदुला सोहोनी म्हणाल्या,'ब्लॉकचेन तंत्रज्ञान योग्य दिशेने प्रवाहित करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देणारे सत्र उपयुक्त ठरले आहे.याविषयी मीटर सॉफ्टवेअर कंपनी बरोबर परस्पर सहकार्य करार करण्यात आला असून त्यामुळे प्रशिक्षण आणि जागृती विषयक उपक्रम केले जाणार आहेत'.
'ब्लॉकचेन आणि डीसेंट्रलाइज फायनान्स' वर विचार मंथन
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२३ ०५:१२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२३ ०५:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: