पिंपरी : ताथवडे, वाकड परिसरातील जे एस पी एम महाविद्यालयाच्या नजिक रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिरुपती कॅरियरच्या एका टॆंकरमधून प्रोपलीन गॅस अनधिकृतपणे सिलेंडरमध्ये भरण्याचे काम सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला. यामुळे घाबरून गॅस भरण्याचे काम करणारे कामगार तेथून पळून गेले. यामुळे तेथे असलेल्या गॅस सिलेंडरचे स्फ़ोट होण्यास सुरुवात झाली. या आगीमुळे जे एस पी एम महाविद्यालयाच्या तेथे उभ्या करण्यात आलेल्या तीन ते चार बसेसनीही पेट घेतला.
सिलेंडरचे स्फ़ोट इतके जोरदार होते की याचा आवाज व धक्का सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत जाणवला. यामुळे जेएसपीएम महाविद्यालयातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भीतीने घराबाहेर धाव घेतली.
महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला आणि पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनदलाने आग आटोक्यात आणली.त्यावेळी तेथे २७ सिलेंडर आढळले. त्यापैकी ९ सिलेंडर्सचा स्फ़ोट झाला होता. तर, ८ मधून गळती सुरू झाली होती उर्वरित सुरक्षित होते.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे आग विझवण्यात यश आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: