'इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.'च्या सहकार्याने प्लास्टिक कचरा संकलन आणि ग्रामस्वच्छता अभियान

 


पुणे : इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि. च्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सहकार्याने 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट'(पुणे)  तर्फे  रसायनी- पाताळगंगा परिसरातील ११ गावात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन संबंधित महत्वपूर्ण काम केले जात असून ग्राम स्वच्छता अभियान आणि कचरा संकलन करण्यात आले.'स्वच्छ भारत दिवस २०२३' च्या निमित्ताने  कराडे बुद्रुक या गावी प्लास्टिक कचरा संकलन आणि ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रामस्थांची इच्छाशक्ती आणि भारत सरकारच्या “स्वच्छता हीच सेवा: एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी” या आवाहनास प्रतिसाद असे दोन्ही उद्देश एकत्रितपणे साधले गेले. या कार्यक्रमात इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक तोशिया नामिगिशी, भूषण दामले(ज्येष्ठ प्रबंधक,जोखीम व्यवस्थापन,इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.)आणि २८ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 या द्वारे प्लास्टिकचे धोके, प्लास्टिकचा वापर टाळणे, पुनर्वापर इ. आणि यासारख्या उपाय योजनांचे संदेश आता पर्यंत देण्यात आले .या कार्यक्रमामध्ये 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट'चे उपमहासंचालक डॉ. मुकेश कणसकर यांनी  इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.पुरस्कृत प्रकल्पाची माहिती दिली. प्रमुख पाहुणे तोशिया नामिगिशी यांनी सभेला संबोधित करताना ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि दिवसेंदिवस प्लास्टिक प्रदूषण समस्या अक्राळ विक्राळ रूप घेत आहे त्यामुळे सर्वांनी सामाजिक बांधीलकी म्हणून या प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले.

या कार्यक्रमात नजीकच्या ११ गावात संस्था कार्य करीत असताना त्यामध्ये उल्लेखनीय सहभाग देऊन मोलाचे सहकार्य करणाऱ्या प्रतिनिधी मंडळींच्या कार्याला पूरक साहित्य प्रदान करण्यात आले. या साहित्यात प्रत्येकी एक सौर दिवा, प्लास्टिक प्रदूषण विषयावरील पोस्टर संच, कापडी पिशवी यांचाही समावेश होता.या कार्यक्रमा दरम्यान स्थानिक मुलांचे विषयानुरूप पथनाट्य, पपेट शो (बाहुल्यांचा खेळ) देखील सादर करण्यात आले. वाया गेलेल्या प्लास्टिक बाटल्या वापरून बाहुल्या आणि छोटीशी रोपे लावता येतील अशा शोभिवंत कुंड्या तयार करण्याच्या सत्रात इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि. येथील २८ कर्मचारी व स्वयंसेवक यांचेसह शाळेतील मुलामुलींबरोबर प्रमुख पाहुणे तोशिया नामिगिशी यांनी देखील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांशी प्रदीर्घ संवाद साधला.

सरते शेवटी ग्रामस्वच्छता आणि सायकलला लावलेल्या आकर्षक प्लास्टिक संकलन पेट्यामध्ये ग्राम फेरीद्वारे प्लास्टिक संकलन केले गेले आणि प्रत्यक्ष कृतीसाठी केलेला निश्चय पूर्ण केला गेला. यावेळी वापरलेले प्लास्टिक गोळा करून ते कचरा वेचकाकडे सुपूर्त करणेसाठी एकत्र ठेवण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करणे करता भूषण दामले(ज्येष्ठ प्रबंधक, जोखीम व्यवस्थापन,  इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.) यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास जांभिवली ग्रुप ग्रामपंचायत च्या  उपसरपंच मनिषा साळवी व सदस्या वेदिका जाईलकर, कराडे बुद्रुक जि.प. शाळा मुख्याध्यापक  संदिप मांगले, रा.से.यो.प्रमुख  विजय कोंडीलकर, रायगड भूषण शंकर गोडीवले, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य  विकास रायकर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेचे  विकास जाधव, श्रीनिवास इंदापूरकर आणि डॉ. श्रीकांत खाडिलकर यांच्यासह अन्य मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती.दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा कार्यक्रम झाला. 
'इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.'च्या सहकार्याने प्लास्टिक कचरा संकलन आणि ग्रामस्वच्छता अभियान  'इदेमित्सू ल्यूब इंडिया प्रा.लि.'च्या सहकार्याने प्लास्टिक कचरा संकलन आणि ग्रामस्वच्छता अभियान Reviewed by ANN news network on १०/१०/२०२३ ०४:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".