उर्से (ता. मावळ) : येथील स्माईल व्यसनमुक्ती केंद्र व ग्रामपंचायत उर्से यांनी संयुक्तपणे गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
श्री पद्मावती माता परिसरातून या अभियानाची सुरुवात झाली. माझा भारत स्वच्छ भारत', माझा भारत व्यसनमुक्त भारत 'अशा विविध प्रकारच्या घोषणांनी उर्से परिसर दुमदुमून गेला. उर्से गाव, ग्रामपंचायत परिसर, रस्ते स्वच्छ व सुशोभित करण्यात आले. स्वच्छता अभियानाची सांगता उर्से ग्रामपंचायत येथे करण्यात आली.
या प्रसंगी आपल्या मनोगतात स्माईलचे संचालक श्री हर्षल पंडित यांनी स्वच्छ भारत व व्यसनमुक्ती ही आपली जबाबदारी असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी श्री विवेक सर्जेराव व उर्से गावच्या युवा महिला सरपंच भारती गावडे यांनी आपले विचार मांडले. सामाजिक कार्यकर्ते श्री मारुती कारके यांनी या कार्यक्रमास आपले योगदान दिले. गांधीजींच्या वेशभूषेत श्री जयंत खेर्डेकर यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य, पद्मावती माता ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्माईलचे प्रकल्प समन्वयक श्री अमोल कुलकर्णी, श्री प्रणव देशमुख, श्री अनिल सावंत, श्री नितीन नाटेकर, श्री हर्षल जोशी, श्री राहुल बोरुडे, श्री रोहन यादव,श्री आनंद राहुल केळकर यांनी परिश्रम घेतले.
Reviewed by ANN news network
on
१०/०२/२०२३ ०९:३९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: