मी उदयन फ़डणवीस आणि; तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात!; छत्रपती उदयनराजे भोसलेंनी केली फ़डणवीसांची पाठराखण (VIDEO)
पुणे : गेले दोन तीन दिवस राज्यातील राजकारण मराठा आरक्षण, जालन्यातील लाठीचार्ज आणि त्यानंतर या परिस्थितीचा राजकीय फ़ायदा घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांची सुरू असलेली चढाओढ यामुळे ढवळून निघाले आहे.
मराठा आरक्षणासाठी पेटून उठलेल्या या आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यालाही पवारसाहेब ४० वर्षे काय केले असा सवाल करत आंदोलकांनी आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला आपण बांधले जाणार नसल्याचे दाखवून दिले आहे.
या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधीपक्षाकडून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या राजीनाम्याची आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. मात्र, या सर्व गदारोळात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फ़डणवीस यांची पाठराखण केली आहे.
साता-यात झालेल्या भाजपच्या टिफ़िन बैठकीत उदयनराजेंचा बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राजे म्हणतात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: