बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी : शनिवार दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र किल्लेदार यांच्याद्वारे संपादित "मराठी कविताएं हिन्दी में" या मराठी कवितांच्या हिंदी अनुवादित प्रातिनिधिक संग्रहाचे प्रकाशन झाले.
अध्यक्षस्थानी चैती समाचार या साप्ताहिकाच्या संपादक डॉ. उमा कंपूवाले होत्या. मुख्य पाहुणे म्हणून हिंदी साहित्यकार माताप्रसाद शुक्ल, गजलकार श्री राम अवध विश्वकर्मा, ज्येष्ठ कवि शिवाजी सांगळे हे उपस्थित होते. त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
पुणे पिंपरी चिंचवडच्या संध्या केळकर, यशवंत देव, तुकाराम पाटील, मकरंद घाणेकर,विश्वनाथ शिरढोणकर, जागृति निखारे या काव्यानंद प्रतिष्ठानच्या सभासदांच्या कविता यात अंतर्भूत आहेत.
सदर पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक वि. ग.सातपुते यांची प्रस्तावना लाभली आहे तर मुख्यपृष्ठ शिवाजी सांगळे यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०४/२०२३ ०४:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: