पिंपळे सौदागर येथे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा मृत्यू; महावितरणने मेंढपाळास नुकसान भरपाई द्यावी : नाना काटे (VIDEO)

 


पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॅालनी गावठाण बीआरटीएस मार्गालगत मेंढपाळ शेळ्यांचा कळप घेऊन जाताना रस्त्यालगत असणाऱ्या महावितरणच्या डी.पी.  बॅाक्स मधील वायरचा शॅाक लागून तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. 

मेंढपाळाच्या माहीतीनुसार सर्वांत प्रथम एक बकरी त्या डीपी बॅाक्स जवळ जाऊन कोसळली त्याला वाटले तीला चक्कर आली असेल त्यामुळे मेंढपाळ त्या शेळीला पाहण्यसाठी जवळ गेला असता त्यालासुध्दा वीजेचा धक्का बसला व तो बाजुला फेकला गेला. सुदैवाने  मेंढपाळाचा या दुर्घटनेत जीव वाचला, परंतु पुन्हा त्याजागी त्याच कळपातील आणखी दोन शेळ्या गेल्या व मेंढपाळाच्या डोळ्यांसमोर त्यांचा देखील वीजेचा धक्का लागून जीव गेला, महावितरणच्या हलगर्जीमुळे ३ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.  महावितरणच्या कर्मचारी, ठेकेदार, यांच्यावर कारवाई करावी तसेच त्या मेंढपाळास झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा सूचना संबधीत  अधिका-यांना केल्या. तसेच,  त्वरीत सदर डीपी बॅाक्स बदलून नविन बसवण्यात यावा व विश्वशांती कॅालनी गावठाण मधील वीज पुरवठा करणाऱ्यावायर या अंडरग्राउंड कराव्या अशा सूचना देखील महावितरला नाना काटे यांनी केल्या आहेत. 

पिंपळे सौदागर येथे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा मृत्यू; महावितरणने मेंढपाळास नुकसान भरपाई द्यावी : नाना काटे (VIDEO) पिंपळे सौदागर येथे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा मृत्यू; महावितरणने मेंढपाळास नुकसान भरपाई द्यावी : नाना काटे (VIDEO) Reviewed by ANN news network on ९/२०/२०२३ ०७:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".