हडपसर : हडपसर ते सासवड मार्गावर दिवेघाटात रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक जखमी बिबट्या रस्त्यावर दिसून आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फ़िरू लागल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी याची शहानिशा करण्यासाठी दिवेघाटात जाऊन पाहणी केली असता त्यांना रस्त्यावर रक्ताचे डाग आणि कड्याजवळ बिबट्याच्या पायाचे ठ्से आढळले, त्यामुळे हा व्हिडिओ खरा असल्याची वनखात्याची खात्री झाली असून जखमी बिबट्याचा शोध सुरू असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या भागातून प्रवास करताना दुचाकीवरील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनखात्याने केले आहे.
हडपसर ते सासवड मार्गावर जखमी बिबट्याचा वावर (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/०४/२०२३ ११:२१:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०४/२०२३ ११:२१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: