पुणे : 'स्वरूपा उटगी क्लासिकल डान्स कंपनी' यांच्यावतीने 'नवविधा भक्ती' या भरतनाट्यम नृत्य नाटिकेचे शुक्रवार,८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.ही नृत्यनाटिका बाल शिक्षण मंदिर सभागृह (मयूर कॉलनी,कोथरूड) येथे सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे.लेखन आणि नृत्यदिग्दर्शन स्वरूपा उटगी यांचे असून त्यांच्या १८ विद्यार्थिनी ही नृत्य नाटिका सादर करणार आहेत.संगीत केदार पंडित यांचे आहे. परंपरेनुसार नारायण भक्तीचे नऊ मार्ग कथन केले आहेत.'नवविधा' या भरतनाट्यम् नृत्य-नाटिके मध्ये, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगातल्या भक्तांच्या कथा प्रस्तुत करण्यात येणार आहेत.
स्वरुपा उटगी ,सृष्टी जोशी,मानसी गिरमे,स्नेहल झंवर,भक्ती भिलवड़कर,वीणा शेपाळ,अर्चना नहार,ऐश्वर्या डांगे,हीर देढिया,अक्षता खटावकर,चैत्राली वडनेरे,सायंती शारंगपाणी,शिरीन मुद्गल,विद्या भगारिया,अस्मिता जोशी,वल्लरी परुंडेकर,काव्या भोसले,कार्तिकी भूमकर सहभागी होणार आहेत. काही देणगी प्रवेशिका सभागृहावर ८ सप्टेंबर रोजी उपलब्ध होतील
Reviewed by ANN news network
on
९/०४/२०२३ १२:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: