देहूगाव : देहूगाव येथील सुनिती विद्यालयामध्ये आज आदित्य एल-1 सूर्ययान मोहिम यशस्वी होण्यासाठी, शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी डमरू वाजवून शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या संचालिका व प्राचार्या सोनाली उल्हास मापुस्कर व शिक्षिका जान्हवी कुलकर्णी यांनी मुलांना आदित्य एल-1 मिशन काय आहे, याची माहिती दिली व जगाच्या पाठीवर ठसा उमटवणाऱ्या भारताची नेत्रदीपक कामगिरी व कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष उषा विठ्ठल मापुस्कर, यांचे स्वप्न आहे की या शाळेतील मुले पद्मश्री डॉ. सुहास मापुस्कर यांच्यासारखे संस्कारी व देशासाठी काहीतरी करणारे विद्यार्थी घडावेत. यासाठी मापुस्कर गुरुकुल मध्ये विविध उपक्रम राबवले जातात असे सह संस्थापक व उपाध्यक्ष श्री उल्हास आनंद मापुस्कर यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ ०१:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: