उद्योगजगताला अपेक्षित असलेली कौशल्ये विद्यार्थिदशेपासून आत्मसात करावी : गुरबक्ष सिंग

 



यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)

च्या एमबीए  आणि एमसीए विद्यार्थ्यांच्या  यशोप्रवेश ; -इंडक्शन  सोहळ्याला उत्साहात सुरुवात

 

पिंपरी  : उद्योगजगताला अपेक्षित  असलेली  कौशल्ये युवकांनी  विद्यार्थिदशेतच आत्मसात  करण्यास सुरुवात करावी असे  मत ईगल बर्गमन इंडिया कंपनीचे  व्यवस्थापकीय  संचालक गुरबक्ष  सिंग  यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारीचिंचवड इथे यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएसच्या एमबीए   एमसीए  विद्यार्थ्यांच्या यशोप्रवेश या इंडक्शन अर्थात प्रवेश सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत  होते.


युवकांसाठी अमर्याद  संधी उपलब्ध असून त्या प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम करायला  हवे असेही  ते म्हणालेसामूहिक राष्ट्रगीत  गायन   सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची  सुरुवात  झालीकार्यक्रमाच्या  प्रास्ताविकात  संस्थेचे  संचालक  डॉशिवाजी  मुंढे  यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत  करीत संस्थेची  माहिती  दिली.


तर संस्थेचे  अध्यक्ष विश्वेश  कुलकर्णी यांनी  आपल्या मनोगतात  सांगितले किविद्यार्थ्यांनी  त्यांच्या दोन  वर्षांच्या  एमबीए   एमसीए  अभ्यासक्रमा दरम्यान शिस्तदृढनिश्चय  समर्पण भावनेने कार्यरत राहावे तसेच  उद्योजकता  आणि  नेतृत्व  कौशल्य वृद्धिंगत करण्यावर विद्यार्थ्यांनी भर  द्यावा असेही  कुलकर्णी  यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात ईगल बर्गमन इंडिया कंपेनीच्या वरिष्ठ मनुष्यबळ  व्यवस्थापिका पल्लवी  भोईटे यांनी त्यांच्या  मनोगतात सांगितले किविद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या  विकासासाठी या  दोन वर्षांचा  योग्य पद्धतीने वापर करायला हवा असे सांगत आपल्याला ज्या विषयात  जास्त गती आणि रुची असेल  त्या विषयाचे सखोल ज्ञान  मिळवण्यासाठी प्रयत्नरत राहावेतसेच स्मार्ट  डिजिटल उपकरणांच्या  वापरासोबतच  केस स्टडी   पुस्तकांच्या वाचनावरही  भर द्यावा असे सांगितले.


प्रवेश  सोहळ्याच्या  पहिल्या दिवसाचा समारोप कर्नल  समीर कुलकर्णी यांच्या तणाव  व्यवस्थापन  या विषयावरील  सत्राने करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाला  संस्थेचे प्राध्यापक वर्ग  विद्यार्थी उपस्थित  होते

उद्योगजगताला अपेक्षित असलेली कौशल्ये विद्यार्थिदशेपासून आत्मसात करावी : गुरबक्ष सिंग उद्योगजगताला अपेक्षित असलेली  कौशल्ये विद्यार्थिदशेपासून आत्मसात   करावी : गुरबक्ष  सिंग Reviewed by ANN news network on ९/०२/२०२३ ०१:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".