महिंद्रातर्फे बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स बाजारात; किंमत १३.९९ लाख रुपये

 




टाईप बी रुग्णवाहिका विभागातील लहान व्हॅन-आधारित ऑफरिंग आणि मोठ्या कोच-आधारित ऑफरिंगमधील अंतर भरून काढण्याचे उद्दिष्ट


·         बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स ही मोठी शहरेलहान गावे आणि देशातील मध्यवर्ती ठिकाणी वाढत्या रुग्ण वाहतूक क्षेत्राच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली सिद्धहस्त प्लॅटफॉर्मवर आधारित एक बहुआयामी ऑफर आहे.


·         प्रगत बोलेरो निओ प्लॅटफॉर्मच्या दीर्घ आवृत्तीवर बांधलेली ही प्रशस्त रुग्णवाहिका मजबूत बॉडी-ऑन-फ्रेम आर्किटेक्चरसह येते आणि विविध भूप्रदेशात अधिक कार्यक्षमतेसाठी आणि सुरळीत चालविण्यायोग्यतेसाठी विश्वसनीय 2.2L mHawk इंजिनासह येते.

 

मुंबई : भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने  बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स सादर करत असल्याची अभिमानास्पद घोषणा आज केली. टाइप बी रुग्णवाहिका विभागाचे नियमन करणाऱ्या AIS:125 (भाग 1) नियमांचे पूर्णपणे पालन करून  तयार करण्यात आलेली निओ + त्याच्या उत्कृष्ट OEM-स्तरीय बिल्ड गुणवत्तेसाठी वेगळी ठरत असून मोठी शहरेलहान गावे आणि देशातील मध्यवर्ती ठिकाणी खरेदीदारांना आकर्षित करेल.

 

निओ+ मध्येही २०२१ मध्ये सादर झालेल्या बोलेरो निओ सारख्याच मजबूत पायावर आधारलेली वैशिष्ट्ये आहेत परंतु अधिक प्रशस्त केबिनसाठी लांब व्हीलबेस आणि विविध बाजारपेठांमधील रुग्णवाहिका मालक आणि ऑपरेटरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक शक्तिशाली 2.2L mHawk इंजिनही यात आहे.

 

बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्सची किंमत ईएसआर १३.९९ लाख रुपये असून सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) किंमत १२.३१ लाख रुपये आहे.

 

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स सादर करत आम्ही राष्ट्र उभारणीसाठी आमची बांधिलकी अधिक दृढ केली आहे. बोलेरो ब्रँडने समाजाच्या विकासासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी दीर्घकाळ सेवा दिली आहे. पोलिसलष्कर आणि निमलष्करी दलांपासून ते अग्निशमनवनीकरणसिंचन आणि सार्वजनिक कामांमध्ये गुंतलेल्या सरकारी विभागांपर्यंतसर्वांनी विविध कामकाजीय वातावरणात मजबूत आणि कार्यक्षम कामगिरीसाठी बोलेरो बॅज एसयूव्हीवर विश्वास दाखविला आहे. बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स आपल्या अष्टपैलू कार्यक्षमतेसह काही ठराविक भागापुरते  मर्यादित नाही परंतु विशेषत: लहान शहरे आणि मध्यवर्ती भागातील दुर्गम भागात असलेल्यांसाठी आरोग्य सेवांमध्ये सुलभता वाढवून हा वारसा पुढे चालू ठेवत आहे.

 

बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स बद्दल:

बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स मजबूत निओ प्लॅटफॉर्म आणि त्याच्या Gen-3 चासीद्वारे आधारित असून त्यामध्ये उच्च-शक्तीचे स्टील बॉडी शेल आहे. निओ+ अॅम्ब्युलन्स अधिक शक्तिशाली २.२ लिटर mHawk इंजिनसह रीअर-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्ससह येते. हा सेटअप 120 HP चा पॉवर आउटपुट आणि 280 Nm चा पीक टॉर्क देत आणीबाणीच्या वेळी जलद प्रतिसादाची खात्री देतो.

 

जरी ती त्याच्या मूळ प्लॅटफॉर्मपेक्षा लांब व्हीलबेससह येत असली तरीही निओ+ अॅम्ब्युलन्स आटोपशीर आणि शहराच्या रहदारीमध्ये सहज दिशादर्शन सुनिश्चित करत चालविण्यायोग्य आहे तिची बॉडी ऑन-फ्रेम बांधणी आणि उच्च ग्राउंड क्लीयरन्स हे मध्यवर्ती भूभागासाठी योग्य आहेत. सामर्थ्यवेग आणि जागा एकत्रित करून बोलेरो निओ+ रुग्णवाहिका लहान व्हॅन-आधारित ऑफरिंग क्षमतेपेक्षा जास्त आहे आणि मोठ्या कोच-आधारित रुग्णवाहिकांपेक्षा चांगली व्यावहारिकता आणि कार्यक्षमता सादर करते.

 

विशेष वैद्यकीय उपकरणे:

टाइप बी रुग्णवाहिका विभागाचे नियमन करणाऱ्या AIS:125 (भाग 1) नियमांचे पूर्णपणे पालन करून बोलेरो निओ+ रुग्णवाहिका तयार करण्यात आलेली आहेमहिंद्राने रुग्णाची काळजी आणि वाहतूक कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने अनेक व्यावहारिक वैशिष्ट्यांसह ही रुग्णवाहिका सुसज्ज केली आहे. यात एका व्यक्तीला चालविण्यायोग्य स्ट्रेचर यंत्रणाऑक्सिजन सिलिंडरची तरतूदस्वच्छतेची सुलभ सुविधा देणारी वॉशबेसिन असेंब्ली आणि आणीबाणीच्या वेळी सार्वजनिक पातळीवर स्पष्ट संदेश सुनिश्चित करणारी प्रणाली आहे. तिची कार्यक्षमता आणखी वाढवतबोलेरो निओ+ रुग्णवाहिकेत वातानुकूलित केबिनमध्ये D+4 आसन क्षमता समाविष्ट आहे.


महिंद्रातर्फे बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स बाजारात; किंमत १३.९९ लाख रुपये महिंद्रातर्फे बोलेरो निओ+ अॅम्ब्युलन्स  बाजारात; किंमत १३.९९ लाख रुपये Reviewed by ANN news network on ९/२३/२०२३ ०९:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".