पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती झाली आहे. पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
यावेळी पुणे शहारध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, अजय शितोळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महेश इंगवले,अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते, संजीवनी पुराणिक आदी उपस्थित होते.
मागील महापालिका निवडणुकीत कामठे भाजपच्या तिकिटावर पिंपळे निलख भागातून निवडून आले होते. नगरसेवकपदाचा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना शहराध्यक्षपद मिळाले आहे.
अजित पवार यांचे प्राबल्य असणा-या पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार गटाचे कार्य वाढविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
Reviewed by ANN news network
on
९/१७/२०२३ १०:३८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: