पिंपरी : तब्बल ६ महिन्यांपूर्वी आपल्याच मित्राचा खून करणा-या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी ,मोठ्या चिकाटीने तपास करून जेरबंद केले आहे. या प्रकरणी कोणताही पुरावा आढळत नसल्याने या गुन्ह्याचा तपास करणे हे पोलिसांसमोर आव्हान होते.
थेरगाव येथील दिनेश दशरथ कांबळे हा २६ वर्षांचा तरुण ६ महिन्यांपूर्वी बेपता झाला होता. त्याबाबत त्याची आई माया दशरथ कांबळे,राहणार एकता कॉलनी, बापूजीबुवानगर, थेरगाव हिने वाकड पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मृत दिनेश अनेकदा आपल्या मित्रांकडे १० -१५ दिवस जाऊन रहात असे. असाच एकदा तो मित्रांकडे जाऊन राहिला होता. मात्र, या वेळी त्याने आपल्या वडिलांची सोन्याची चेनबरोबर नेली होती ती परत आणली नव्हती म्हणून त्याच्या आईने त्याला जाब विचारला. त्यावर तो चेन घेऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला तो परतलाच नाही. या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करत होते.
तपास सुरू असताना दिनेश आणि त्याचे मित्र सिध्दांत रतन पाचपिंडे व प्रतिक रमेश सरवदे १५ मार्च रोजी रात्री काळेवाडी फाट्याशेजारील ग्राऊंडवर दारू पित बसले होते; त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दोघांनाही त्याब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
दारू पित असताना दिनेश याने प्रतिक सरवदे याच्या पत्नीबाबत अश्लिल भाषा वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचेत भांडण झाले. भांडणात प्रतिक रमेश सरवदे व सिध्दांत रतन पाचपिंडे यांनी दिनेश याचे डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला जखमी केले व तेथून निघून गेले. दोघेही रात्री ११ च्या सुमारास.परत आले व जखमी अवस्थेत पडलेल्या दिनेश याला मोपेडवर मध्ये बसविले. त्याला औंध, दापोडी परिसरात फ़िरवून १६ मार्च रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास त्याला नाशिकफ़ाटा येथील उड्डाणपुलावरून फ़ेकून देऊन त्याचा खून केला. त्याच्या खिशात ओळख पटविणारी कोणतीही वस्तू नसल्याने बेवारस व्यक्तीचा अपघाती मृत्यू अशी नोंद भोसरी पोलिसात करण्यात आली होती.
आता या प्रकरणाचा छडा वाकड पोलिसांनी लावला आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फ़ौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, हवालदार वंदु गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, नाईक अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, प्रशांत गिलबीले, शिपाई अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२३ ०८:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: