दिलीप शिंदे
सोयगाव : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज करत गोळीबार केल्याची घटनेच्या निषेधार्थ सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करीत निषेध करण्यात आला.
अंतरवली सराटी येथील उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज मध्ये महिलासह शेकडो आंदोलनकर्त गंभीर रित्या जखमी झाले.या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.०२) सकल मराठा समाजाच्या वतीने सोयगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.राज्य सरकारच्या निषेधार्थ एक तास निषेध करण्यात आला.पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज आणि गोळीबार कुणाच्या सांगण्यावरून केला यांच्या चौकशीसाठी विशेष उच्च समिती गठीत करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्तानी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्याकडे केली.सरकारच्या विरोधातील घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी रवी काळे,विजय काळे,विजय चौधरी,भैय्या जुनघरे,सुनील ठोंबरे,बंडु कळवत्रे,मयुर मनगटे,अरुण काळे,दत्तु निकम,दत्तु सोनवणे,दिपक पाटील,आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (दि.०५) सोयगाव तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी साखळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा मोर्चा समन्वयक विजय काळे यांनी सांगितले त्यामुळे आता सोयगाव तालुकाही साखळी पद्धतीने जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावाच्या आंदोलनात सहभागी होणार आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांचेसह अजय कोळी राजू बर्डे रवींद्र तायडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ ०८:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: