'आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसू नये; लिहिते व्हावे'; दामोदर मावजो यांचा सल्ला



 पिंपरी : आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसण्याची वृत्ती अंगी बाळगू नयेही वृत्ती स्वतःच्या स्वास्थसाठी योग्य असेलमात्र समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाहीअसा सल्ला ज्येष्ठ साहित्यिकज्ञानपीठाकार  दामोदर मावजो यांनी दिलाफायटर झाल्याशिवाय रायटर होऊ शकत नाहीअभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी  आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

 

    डॉडीवाय.  विद्यापीठ वतीने आयोजित डॉपीडीपाटील (स्वागताध्यक्ष ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड २०१६ आणि १८वे जागतिक मराठी संमेलन २०२३यांच्या संकल्पनेतून ८९व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित तसेच जागतिक मराठी संमेलनावर आधारित 'साहित्य संचितआणि 'शोध मराठी मनाचा २०२३या दोन ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवारी  पद्मश्री डॉडीवायपाटील विद्यापीठ सभागृहात ज्येष्ठ साहित्यिकज्ञानपीठाकार  दामोदर मावजो (गोवायांच्या हस्ते झालेयावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होतीतर  अध्यक्षस्थानी डॉडीवायपाटील विद्यापीठाचे कुलपती डॉपीडीपाटील हे होतेजागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे  माजी कायदामंत्री ऍडरमाकांत खलपविद्यापीठाच्या विश्वस्त  संचालिका डॉस्मिता जाधवकुलगुरू डॉएनजेपवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेयावेळी ग्रंथांच्या प्रकाशनासह -बुक तसेच संमेलनांच्या यूट्यूब चैनल्सचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झालेतसेच अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉरवींद्र शोभणे यांचा सपत्नीक विशेष सत्कार डॉडीवायपाटील विद्यापीठाच्या वतीने  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

 

दामोदर मावजो म्हणालेभाषा ही एकमेकांशी जोडणारी आहेकोकणी आणि मराठी भाषा अद्वैत आहेबहुभाषिक संस्कृती पुढे नेण्यासाठी मराठी आणि कोकणी भाषेचे संमेलन घेण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.  डॉपीडीपाटील यांनी संमेलनाच्या नियोजन यशस्वीपणे पार पाडले89 साहित्य संमेलनात साहित्य मंथन केले.  या मंथनातून संचित अमृतकुंभ निर्माण केलेत्यांचे हे अमृतकुंभ मी सेवन केलेच या पुढील  पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहेशिक्षण आणि साहित्य याचा फार घनिष्ठ संबंध आहे याचा मिलाफ पाटील यांनी घडवून आणला आहेमहाविद्यालयीन शिक्षणात साहित्य हा विषय अनिवार्य केला पाहिजेअसेही यावेळी त्यांनी अपेक्षा केलीसध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहेया विकसीत तंत्रज्ञानाची सांगड घालून नवीन पिढीसमोर मांडायला हवेतरुण पिढीला आवडेल आशा साहित्याची निर्मिती झाली पाहिजेसमाजात जे बदल होत आहेत ते प्रतिबिंबित झाले पाहिजे.

  

सुशीलकुमार शिंदे म्हणाले,89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रात्रंदिवस काम केलेआजही हे संमेलन काल परवा झाला असे वाटतेहा मिळालेला साहित्याचा आनंद विसरू शकत नाहीडॉपीडीपाटील यांनी ऐतिहासिक काम केले आहेसमाजाला भरभरून देण्याचे काम पाटील आजही त्याच उत्साहाने करीत आहेसमाजाचे देने म्हणून त्यांनी साहित्यावर प्रचंड खर्च केला आहेसमाज सुधारला पाहिजेअंधश्रद्धेकडे  जाता नवविचारकडे वळण्यासाठी काम केले आहेअसे कौतुक पाटील यांचे केले.

 

रामदास फुटाणे म्हणालेसाहित्य संमेलनाला कायम जिवंत ठवण्याचे काम आजच्या प्रकाशनाच्या ग्रंथामुळे झालेया ग्रंथामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेलसाहित्य संमेलन हा उरूस होऊ नयेतरुणांना जगण्याची दिशा मिळाली पाहिजेशिक्षण संस्था मध्ये संमेलन झाले पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

रविंद शोभणे म्हणालेमराठी साहित्य संमेलनाची परंपरा शतकाकडे चालली आहेसामान्यांना प्रश्न विचारण्याचे बळ साहित्यिक देत असतोलेखक समाजाचा घटक असून त्यांच्या उन्नतीसाठी झटत असतोसाहित्य हा समाजाचा आरसा नसून उद्गार आहे.

 

रमाकांत खलप म्हणाले,  साहित्य संमेलनांचे शिवधनुष्य उचलण्याचे काम पाटील यांनी यशस्वीपणे केले आहेआता यापुढे कोकणी आणि मराठी भाषेचे संयुक्त संमेलन घ्यावेउपभाषांना देखील यात स्थान मिळावे.

डॉ.  पीडीपाटील म्हणाले,89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उंचीवर गेले आहे.  या संमलनाचे ग्रंथरूपी काम करण्यास 7वर्षे गेली.

 

अनेक दिग्गज साहित्यिक संमेलनात आलेहा अनुभव समाजाला देण्यासाठी पुढाकार घेतलाहा संमेलनाचा अनुभव कायम पाहता यावा हा प्रयत्न केला।असल्याचेयावेळी डॉपाटील यांनी सांगितले.

 

 ग्रंथाचे संपादक सुनील चव्हाण  श्रीधर लोणी यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायावेळी त्यांनी आगळेवेगळे झालेले 'साहित्य संचित ग्रंथ   बुक निर्मिती कशी झालीमुलाखतीभाषेचा जागर,  वैश्विक साहित्य निर्मिती करण्याची संधी मिळाली अशी भावना यावेळी दोघांनी व्यक्त केल्यायावेळी 89 वे मराठी साहित्य संमेलन आयोजनात सहकारी त्यावेळच्या महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य,  सुनील महाजनप्रामिलिंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

 

प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केलेते म्हणाले,89 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉडीवायपाटील विद्यापीठ आयोजित केले होतेहे संमेलन वेगळ्या उंचीवर गेले आहेसंमेलनात विविध भाषेचे हजाराहून साहित्यिक सहभागी झाले होतेयात ज्ञानपीठकारांची मुलाखती दिल्या होत्यारसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होतासाहित्यिककवीरसिक यांच्या सहभागामुळे मराठी भाषेचा उत्सव रंगला होताया सर्व उत्सवाची एकत्रित ग्रंथात उतरविण्यात आली आहेया ग्रंथासाठी जेष्ठ साहित्यिक  ज्ञानपीठकार डॉभालचंद्र नेमाडे यांनी प्रस्तावना लिहिली आहेतसेच यावेळी संमेलनाचा आढावा घेत माहिती दिलीसूत्रसंचालन प्रावर्षा तोडमल यांनी केलेतर 'संवाद पुणे'चे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आभार मानले.

 

'आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसू नये; लिहिते व्हावे'; दामोदर मावजो यांचा सल्ला  'आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसू नये; लिहिते व्हावे';  दामोदर मावजो यांचा सल्ला Reviewed by ANN news network on ९/१६/२०२३ ११:५२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".