मुंबई : गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडने
त्यांचे ‘गल्फ सुपरफ्लीट
सुरक्षा बंधन’ कॅम्पेन परत सुरू होत असल्याची घोषणा केली आहे.
सर्व स्तरांवर नावाजल्या गेलेल्या या कॅम्पेनचे हे पाचवे वर्ष आहे. संपूर्ण देश
रक्षाबंधन साजरे करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गल्फने लॉजिस्टिक क्षेत्राचा कणा
असलेल्या ट्रक चालकांचे आरोग्य व सुरक्षेप्रती आपली बांधिलकी परत दाखवून दिली आहे.
हे कॅम्पेन कंपनीच्या ‘ह्युमन फर्स्ट’ ब्रँड
बनण्याच्या विचारसरणीशी सुसंगत आहे. कंपनीने कायमच उत्पादन-सुविधेच्या पलीकडे जात
ग्राहकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यास प्राधान्य दिले आहे. यावर्षीचे
कॅम्पेन दळणवळणाची चाके अखंडपणे सुरू ठेवणाऱ्या ट्रकिंग हिरोजसाठी जास्त सुरक्षित
आयुष्याची निर्मिती करण्याच्या गल्फच्या बांधिलकीशी अनुसरून तयार करण्यात आले आहे.
ट्रकचालकांचे
आयुष्य सुरक्षित ठेवण्याच्या २०१९ मध्ये प्रयत्नांतून गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन
कॅम्पेन सुरू करण्यात आले होते. सुरक्षा हे गल्फ सुपरफ्लीट टर्बो प्लस इंजिन ऑइलचे
ब्रीदवाक्य आहे आणि कंपनी यावर्षी १०,००० पोर्टेबल
पाणी शुद्धकरण यंत्रांचे वाटप करणार आहे. ही उपकरणे ट्रक चालकांना त्यांच्या
प्रवासात पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देत त्यांचे आयुष्य उंचावण्यास
मदत करतील. या उपकरणांमुळे प्रवासात असतानाही त्यांना आपले स्वास्थ्य जपण्यास मदत
होईल.
त्याशिवाय
गल्फद्वारे महत्त्वाच्या वाहतूक केंद्रांवर पाणी शुद्धीकरण उपकरणे बसवली जात असून
त्यात कळंबोली (नवी मुंबई), इंदौर, सुरत, जयपूर, लुधियाना, बद्दी, फरिदाबाद, दिल्ली, कानपूर, अमृतसर, अहमदाबाद, आग्रा आणि
वाराणसी यांचा समावेश आहे. या उपकरणांमध्ये दर तासाला २०० लीटर पाणी शुद्ध
करण्याची क्षमता असून त्यामुळे प्रत्येक महिन्याला १५,००० ट्रक चालकांची गरज भागवली जाईल. गल्फने नवी
मुंबई ट्रान्सपोर्ट नगर येथे कायमस्वरुपी दवाखाना सुरू केला असून तिथे ट्रक
चालकांना वर्षभर केव्हाही आपले आरोग्य व डोळ्यांची मोफत तपासणी करून घेता येईल. या
दवाखान्यात डॉक्टर आणि इतर कर्मचारी ट्रकचालकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करतील
तसेच त्यांना आवश्यक औषधे पुरवतील.
गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स
इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी चावला
म्हणाले, ‘ट्रक चालक
लॉजिस्टिक क्षेत्राचे पडद्यामागचे हिरो आहेत आणि ते देशभरात सामानाची वाहतूक
सुरळीतपणे करत असतात. अर्थव्यवस्थेत त्यांची भूमिका इतकी महत्त्वाची असूनही कित्येकदा
त्यांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केले जाते. गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन
कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांना संरक्षण देण्याचे तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी
उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. हा उपक्रम आमच्या कॉर्पोरेट
जबाबदारीशी सुसंगत आहे, जिथे
गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या निर्मितीबरोबरच सामाजिक जबाबदारीवरही भर दिला जातो.’
गल्फ ऑइल
ल्युब्रिकंट्स इंडिया लि.च्या विपणन विभागाचे प्रमुख श्री. अमित घेजी म्हणाले, ‘गल्फमध्ये
आम्हाला अविरतपणे काम करून देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या ट्रक चालकांप्रती तीव्र
कृतज्ञता वाटते. त्यांच्या दैनंदिन जीवनातील आव्हाने पार करण्यास मदत व्हावी या
हेतूने आम्ही गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन कॅम्पेनची पाचवी आवृत्ती जाहीर करत
आहोत. यावर्षीच्या उपक्रमाअंतर्गत त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे.
कॅम्पेनच्या आधीच्या चार वर्षांत आम्ही ट्रक चालकांना विविध प्रकारचे संरक्षण
पुरवले आहे. त्यामध्ये कोविड लस, आरोग्यसेवा
पॅकेज, विमा इत्यादींचा समावेश होता. देश आणि
अर्थव्यवस्थेची चाके थांबू नयेत यासाठी असामान्य योगदान देणाऱ्या ट्रक चालकांप्रती
कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.’
गल्फ सुपरफ्लीट
सुरक्षा बंधन कॅम्पेन हे गल्फच्या औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांप्रती काम
करण्याची बांधिलकी दर्शवणारे आहे. ट्रक चालकांच्या स्वास्थ्याप्रती गल्फला वाटणारी
कळकळ या कॅम्पेनपुरती मर्यादित नाही. गेल्या चार वर्षांत कंपनीने विविध प्रकारचे
उपक्रम हाती घेतले आहेत व त्यात आरोग्य विमा कवच, लसीकरण मोहिमा आणि ट्रक चालकांच्या बहिणींनी
तयार केलेल्या राख्या व पत्रांचे वेळत वितरण केल्याबद्दल गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड
यांचा समावेश आहे. यातून गल्फ देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असलेल्या
ट्रकचालकांना देत असलेला अखंड पाठिंबा दिसून आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: