'जनरेटिव्ह डिझाईन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विषयावर १५ सप्टेंबर रोजी चर्चासत्र

 


'सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज' या संस्थेतर्फे 'गोल्डन डायलॉग्स'   

पुणे : 'सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज' या संस्थेतर्फे 'जनरेटिव्ह डिझाईन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन आर्किटेक्चरल प्रॅक्टिसेस' या विषयावर संवादसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर  निगडित सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी 'गोल्डन डायलॉग्स' या संवादमालेचे आयोजन करण्यात येत असून त्यातील हे चौथे  संवादसत्र १ सप्टेंबर रोजी सायं ५ वाजता नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट(विधी महाविद्यालय रस्ता, पुणे )येथे होणार आहे.  या  संवादसत्रात   आर्किटेक्ट कृष्ण मूर्थी  (मुंबई),आर्किटेक्ट आदित्य चंद्रा (मुंबई),आर्किटेक्ट भैरूमल सुतार(पुणे) या  तज्ज्ञांचे मार्गदर्शन  होणार आहे. आर्किटेक्ट हृषीकेश कुलकर्णी या  चर्चासत्राचे मॉडेरेटिंग करणार आहेत.  'आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेयर्स  असोसिएशन' आणि 'व्हीके ग्रुप ' च्या सहकार्याने ही  संवादमाला होत आहे.  संवादमाला  सर्वांसाठी विनामूल्य व खुली आहे.
 

ज्येष्ठ आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध  आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ही संवादमाला आयोजित करण्यात आली आहे.व्हीके (ऑपरेशन्स)च्या सौ.अपूर्वा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.  

शाश्वत शहर विकासासाठी संवाद 


 पुणेकरांना  भेडसावणाऱ्या शहरी समस्या, पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत शहर विकास,  शहरी जीवनाची गुणवत्ता  अशा गोष्टींवर ऊहापोह करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्थापत्यशास्त्राचे  विद्यार्थी, नागरिक, इंजिनिअर्स, वास्तुविशारद, स्टेकहोल्डर्स यांना या संवादमालेत आमंत्रित करण्यात येणार आहे. या संवाद मालिकेची वर्षभरात पाच सत्रे नियोजित करण्यात आली आहेत.ज्यामध्ये 'रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन, पुणे शहरासाठी हवामान कृती आराखडा, डिझाइन स्पर्धेची भूमिका, शहरी इमारतीमध्ये रेटिंग सिस्टीमचे महत्व, पर्यावरणीय लँडस्केपिंग आणि शाश्वत शहरीकरण  यासारख्या शहर विकासाशी निगडित विविध  विषयांवर तज्ञांसोबत  चर्चा केली जात आहे 

सुवर्णमहोत्सवानिमित्त पुढाकार

  आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी  १९७३ साली सुरु केलेली ही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आता  जवळपास २५० लोकांचे कुटुंब बनली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराचा प्रवास विश्वास कुलकर्णी यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. व्यवसाय कायमच चोख आणि प्रामाणिकपणे करण्याबरोबर त्यांनी समाजोपयोगी काम करण्यावर  भर दिलेला आहे. पुण्यातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या कंपनीचा  पुणे शहराच्या विकासात मोलाचं वाटा आहे. फक्त आर्किटेक्चर प्रॅक्टिस पासून सुरु झालेली ही फर्म आज  शहर नियोजन, पर्यावरण, ग्रीन बिल्डींग्स, इंटेरिअर डिझाइन अशा विविध क्षेत्रात अग्रेसर  आहे. पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा १ हजाराहून अधिक इमारतीचे आरेखन या कंपनीने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप कडून केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने 'टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  
'जनरेटिव्ह डिझाईन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विषयावर १५ सप्टेंबर रोजी चर्चासत्र 'जनरेटिव्ह डिझाईन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विषयावर १५ सप्टेंबर रोजी चर्चासत्र Reviewed by ANN news network on ९/०९/२०२३ १२:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".