मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्निक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन हे उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.
केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२३ ०७:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: