लेख : कृत्रिम हौदांचा पांढरा हत्ती : श्रीगणेशाच्या विटंबनेचा अघोरी प्रकार थांबवा !

 


गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, रंगपंचमी या सण-उत्सवांच्या वेळी प्रदूषण होते’ अशी एक धारणा जाणीवपूर्वक समाजात निर्माण करण्यात आली आहे. याच्याशी आपले निधर्मी शासन आणि प्रशासनही १०० टक्के सहमत आहे. हे त्यांच्या वर्षभर राबवण्यात येणार्‍या मोहिमा, जागृती अभियान, विविध अहवालांचे प्रकाशन, विविध कृती कार्यक्रम यांतून स्पष्ट होते. तर दुसरीकडे बकरी ईदच्या वेळी होणारी लाखो प्राण्यांची कत्तल असो, ताबूतांचे विसर्जन असो, मशिदींवरील वाजणारे भोंगे असोत, राज्यभरातील अनेक पशुवधगृहातून होणारो प्राण्यांची कत्तल असो वा ख्रिस्ती नववर्षांनिमित्त होणारी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजीद्वारे केलेले सेलेब्रेशन असो, यांच्यामुळे प्रदूषण होत नाही किंवा किंबहुना या दृष्टीने या धार्मिक सण-उत्सवांकडे पाहिलेच जात नाही. त्यामुळे त्याविषयी कोणीच चकार शब्द काढत नाही, हे दुर्दैवी आहे. या लेखातून अशीच काही महत्वाची सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून वाचकांनी बोध घेऊन योग्य अयोग्य याचे चिंतन करावे

गणेशोत्सव आल्यावर ‘गणपती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते’ अशी खोटी माहिती देऊन समाजाची दिशाभूल करून गेली काही वर्षे कृत्रिम हौदाची संकल्पना संपूर्ण राज्यात कमी अधिक प्रमाणात राबवली जात आहे.

*प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी नाहीत !*

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे कीप्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या (पी..पी.च्यागणेशमूर्तींमुळे कोणतेही प्रदूषण होत नाहीअसे अनेक वैज्ञानिक अहवालातून स्पष्ट झाले आहेजिप्सम नावाच्या खडकातील पाण्याचा अंश बाहेर काढला कीत्याची जी पावडर बनतेत्याला ‘प्लॉस्टर ऑफ पॅरिस’ किंवा ‘कॅल्शियम सल्फेट’ म्हणतातहा पदार्थ अल्कली नाहीतसेच ॲसिडिकही नाहीतर तो न्युट्रल आहेतो औषधातही वापरला जातोएवढेच नव्हेतर पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतही त्याचा वापर होतोपी..पीसंथ पाण्यात विरघळायला दीड ते दोन महिने लागतातनदीच्या पाण्यात सात ते आठ दिवसांत तो विरघळतोविरघळल्यावर त्याची मातीच बनतेती माती वाळवल्यावर त्याला पुन्हा घट्टपणा वा चिकटपणा रहात नाहीत्यामुळे ‘पीओपी’मुळे पाण्याचे झरे बंद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहीही वैज्ञानिक तथा शास्त्रीय माहिती अनेक संकेतस्थळांवरतसेच गुगल केमिस्ट्रवरही पाहू शकतो.

*गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण अत्यंत नगण्यत्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही !*

महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका२३८ नगरपालिका१३१ नगर पंचायती७ कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट बोर्डद्वारे ५० टक्क्यांहून अधिक मैलाघनकचरा थेट नदी वा नैसर्गिक जलस्त्रोतात सोडला जातोकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार वर्ष २०२०-२१ मध्ये महाराष्ट्रात प्रतिदिन निर्माण होणार्‍या २२ हजार ६३२ टन घनकचर्‍यापैकी केवळ १५ हजार टन घनकचर्‍यावर प्रक्रिया केली जाते अर्थात् जवळजवळ दररोज ८ हजार टन अत्यंत प्रदूषणकारी घनकचरा कुठलीही प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडला जातोत्यातून किती भयंकर प्रदूषण होत असेलयाची कल्पनाही करता येत नाहीहे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘‘सांडपाणी व्यवस्थापन व नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वर्षी एकूण भांडवली खर्चापैकी २५ टक्के तरतूद करून या प्रकल्पावर खर्च करण्यास सांगितले आहेमात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाहीहे वरील प्रदूषणावरून दिसून येतेबहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याची पूर्तता केलेली नसल्याचे प्रदूषण मंडळाचेही म्हणणे आहे.

त्या तुलनेत वर्षातून एकदा येणार्‍या सर्व गणेशमूर्तींचे मिळून वजन निश्चितच अत्यंत म्हणजे अत्यंत कमी असेलतरी शासनाची उपाययोजना म्हणजे ‘नान्हीला बोळा अन् दरवाजा उघडा’अशी झाली आहेथोडक्यात गणेशमूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतात जाणारी माती आणि रंग अत्यंत नगण्य असून त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाहीया मूर्तींवरील रासायनिक रंगांमुळे जे अत्यल्प प्रदूषण होतेते थांबवण्यासाठी शासनाने रासायनिक रंगांच्या जागी नैसर्गिक रंगांनी मूर्ती रंगवण्याची सक्ती केल्यास तेही थांबू शकेलवर्ष २००८ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी म्हटले होते, ‘‘गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण वगैरे काही होत नाही आणि होत असलेतरी ते अगदी नगण्य आहे.’’

*कृत्रिम हौदाबाबत काही वर्षांपूर्वी विविध महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्था यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली असता पुढील माहिती समोर आली होती.*

*कृत्रिम हौदातील गणेमूर्तींचे विसर्जन पुन्हा नैसर्गिक जलस्रोतातचमग कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी? :* गणेशमूर्ती कृत्रिम हौदात पूर्णपणे विरघळत नसल्याने त्याचे पुनर्विसर्जन करावेच लागतेहे करतांना ज्या समुद्रनदी वा नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करण्यावर प्रतिबंध घातला जातोमात्र कृत्रिम हौदा विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे रात्रीच्या वेळी समुद्रनदी वा नैसर्गिक जलस्त्रोतातच गुपचुप विसर्जन केले जातेअसे अनेकदा उघड झाले आहेप्रसिद्धीमाध्यमांनीही याचा वारंवार छायाचित्रांसह भांडाफोड केला आहेजर शासनाने याची वस्तुनिष्ठ माहिती घेतली तर याचे भीषण सत्य समोर येईल.

जर नदीतलावसमुद्रखाणी वा नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करायचेतर कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा जनतेच्या डोळ्या ही धुळफेक कशासाठी शेवटी प्रशासन जे तथाकथित प्रदूषण टाळू इच्छित होतेते प्रदूषण असल्या फसव्या कृतींमुळे एक टक्कादेखील कमी झालेले नाहीउलट जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहेहे पैसे संबंधित महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्याकडून सव्याज वसूल केले पाहिजेतदरवर्षी कृत्रिम हौदासाठी लाखो ते कोट्यवधी रुपये खर्च करत आहेतदरवर्षी कृत्रिम हौदांची संख्या वाढतच आहेत्यासाठी जाहिरातीपत्रकेपोस्टर्सबाजी याचा खर्च वेगळा एवढेच नव्हेतर यासाठी दिली जाणारी कंत्राटेयातून जनतेच्या पैशाचा अपव्यय होत नाही का याचा शासनाने वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून हे अशास्त्रीय कृत्रिम हौद कायमचे बंद करायला हवेत.

*घनकचरा विभागाच्या गाड्यांतून श्रीगणेशमूर्तींच्या वाहतुकीतून होणारी श्रीगणेशाची घोर विटंबना ! :* कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या गणेशमूर्त्यांची वाहतूक काही महापालिका आणि नगरपालिका या घनकचरा विभागाच्या डंपरमधूनट्रॅक्टरमधून मिळेल त्या प्रकारच्या ट्र्क अथवा तत्सम वाहनातून करीत असल्याचे दिसून येतेअशा प्रकारच्या कृती करणे हे महापाप असून हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावणारे आहेतरी अशा प्रकारे होणारी भगवान श्रीगणेशाची घोर विटंबना शासनाने तातडीने थांबवायला हवी.

*कृत्रिम हौदातील गणेमूर्तींचे पुनर्विसर्जन करतांना होणारी विटंबना थांबवा ! :* सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या गणेशमूर्त्यांच्या पुनर्विसर्जनासाठी शासनाची कोणताही ठोस कार्यपद्धती वा धोरण ठरलेले नाहीपरिणामी कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणावर विटंबना होत आहेयात कुठल्याही प्रकारे गणेशमूर्तीचे पावित्र्य राखले जात नाहीकृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती काढण्यासाठी जेव्हा शासकीय कर्मचारी त्यात उतरताततेव्हा त्यांच्या पायाखाली अनेक गणेशमूर्ती येऊन त्याचे हात-पाय भंग होऊन त्यांची विटंबना होतेहे अत्यंत गंभीर असून हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावणारे आहेतसेच कृत्रिम हौदात विसर्जित गणेशमूर्ती दगडांच्या खाणीमध्ये पुनर्विसर्जन करण्याची वा मूर्तींचा चुरा करण्याची वा मातीत गाडण्याच्या ज्या अघोरी व अनिष्टकारी संकल्पना होत्यात्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे त्या योजना बारगळल्या आहेतआता तर अजून नवीन नवीन पर्याय काढले जात असून काही ठिकाणी मूर्तींचा पुनर्वापर करता यावा यादृष्टीने प्रशासन नियोजन करते असे प्रसिद्धीमाध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तामधून लक्ष्यात येतेएकूणच गणेशमूर्तींचे पावित्र्य राखणे आणि नागरिकांच्या धर्मभावना न दुखावता हे सर्व करणे आवश्यक आहे.

*विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींतील चैतन्य सर्वदूर पसरून समाजाला चैतन्य मिळते !*

हौदातून गणेशमूर्ती काढतांना त्यांचे पावित्र्य राखले जात नाहीयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकाही अधार्मिक आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी असे ‘तत्त्वज्ञान’ मांडतात कीगणेशमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना केली कीप्राण येतात आणि उत्तरपूजा झाल्यावर प्राण निघून जातातत्यामुळे ती मातीच रहातेतिचे काही केले तरी चालतेधर्म न मानणारीदेवतांचे अस्तित्त्वमंत्रांचे सामर्थ्य न मानणारी माणसे ‘प्राणप्रतिष्ठापना’ आणि ‘प्राण निघून जाणे’ या संकल्पना येथे मात्र मान्य करतातकोट्यवधी गणेशभक्तांसाठी वा सामान्य माणसासाठी गणपती विसर्जन झाल्यावरही साक्षात् प्राणप्रिय भगवंतपरमेश्वरच असतोम्हणूनच विसर्जनानंतर गणेशमूर्तीची थोडीशी माती घरी आणून लोक तिचा पूजा-आरती करतातती माती पवित्र समजून कपाळाला लावताततसेच घरात लावलेले देवीदेवताराष्ट्रपुरूष वा पूर्वज यांचे फोटो प्राणप्रतिष्ठा केलेले नाहीत म्हणून ते आपण पायाखाली तुडवतो कायाचा विचार झाला पाहिजेउद्या महापालिका आयुक्तमहापौर वा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोणी मातीचे ढेकूळ दिलेतर निश्चितपणे खिडकीतून खाली फेकून दाखवू शकतीलपरंतु त्यांना प्राणप्रतिष्ठा पना केलेली वा उत्तरपूजा केलेली गणेशमूर्ती आणून दिली तर ते खिडकीतून खाली फेकू शकतील कात्या मूर्तीचे हात-पाय तोडणेफोडणेमातीत टाकणेपायाखाली घेणे हे त्यांना शक्य आहे कायाचा शासन आणि लोकप्रतिनिधींनी विचार करणे गरजेचे आहेधर्मशास्त्रात वाहत्या पाण्यात मूर्तीविसर्जनामुळे मूर्तीतील चैतन्य सर्वदूर पसरतेयाचा समाजाला लाभ होतोअसे सांगितले आहेही धार्मिक कृती असल्याने ती धर्मशास्त्रानुसार करणेहे क्रमप्राप्त आहेत्यात पालट करायचा असेलतर तो धर्मशास्त्रातील तज्ञ अधिकारी व्यक्तीच (उदाशंकराचार्यसांगू शकतात.

*गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला अनेक पर्यावरणवादी आणि प्रशासनयांचा विरोध :* गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला अनेक पर्यावरणवादी आणि प्रशासन हे विरोध करताततसेच अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यासतसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे.

*फिरत्या हौदांची नवीन संकल्पना उदयास येणे हा धर्मश्रद्धांवर आघातच !:* कोरोना महामारीच्या काळात त्याचे कारण देत बहुतेक सर्व ठिकाणचे विसर्जन घाट पूर्णपणे बंद करण्यात आले होते त्यातून एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे फिरते हौदसध्या तोच प्रकार पुढे सुरु असून संपूर्ण शहरात ट्रकटेम्पोट्रॅक्टर यामध्ये टाक्या ठेवून ही वाहने शहरातून फिरविणे आणि भाविकांना यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास सांगणेविसर्जन घाट बंद करून फिरते हौद करणे यातून कंत्राटदारांची मौज मजा झाली आहेया माध्यमातून जमविलेल्या मूर्तींचे नेमके काय केले जाते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोविसर्जनाच्या नंतर मात्र मूर्तींची संख्या आणि कोणत्या खाणीत विसर्जन केले अश्या बातम्या येतात एवढेच काय ते लक्ष्यात येतेअश्या माध्यमातूनही धर्मश्रद्धा या पायदळी तुडविल्या जात आहेत हे भक्तांनी लक्ष्यात घ्यायला हवे.

हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत आणि धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन हे वाहत्या पाण्यात करण्यासाठी गणेशभक्तांना आठकाठी आणू नयेतसेच शासनाने अशास्त्रीय कृत्रिम हौदातील ही अघोरी प्रथा तत्काळ बंद करावीमूर्तीदान स्वीकारण्याचा प्रशासन वा अंनिसवाले कोणालाही अधिकार नाहीत्यामुळे मूर्तीदानाची पद्धत बंद व्हायला हवी.

अतिशय महत्वाचे म्हणजे गणेशमूर्ती विसर्जनाविषयी वर्ष २०१० च्या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या सूचनेनुसार ‘‘गणेशमूर्ती विसर्जनासाठी जलाशयामध्ये वा तळ्यामध्ये एका कोपर्‍याला लोखंडी तारेच्या जाळीने बांधलेली दगडी भिंत तयार करून त्या ठिकाणी गणेशभक्तांना गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी पर्याय करून देऊ शकतोअशा प्रकारे स्तुत्य उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्षे राबवत आहेहा तलाव वर्षानुवर्षे टीकतोयामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय पण होणार नाहीतसेच रासायनिक रंगअविघटनशील पदार्थ यांऐवजी पारंपारिक शाडूची मातीनैसर्गिक रंग यांपासून बनवलेल्या गणेशमूर्तीला शासनाने आतापासूनच प्रोत्साहन द्यावेहे करण्यासाठी बुद्धीदाता श्रीगणरायाने शासनाला सुबुद्धी द्यावीहीच त्याच्या चरणी प्रार्थना !

- श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

लेख : कृत्रिम हौदांचा पांढरा हत्ती : श्रीगणेशाच्या विटंबनेचा अघोरी प्रकार थांबवा ! लेख : कृत्रिम हौदांचा पांढरा हत्ती : श्रीगणेशाच्या विटंबनेचा अघोरी प्रकार थांबवा ! Reviewed by ANN news network on ९/२३/२०२३ ०९:४८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".