पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांना टोलमाफ़ीसाठी पासेस देण्याची व्यवस्था पोलिसांनी केली आहे.
गणेश उत्सव कालावधीत कोकणात मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), या मार्गाने जाणा-या गणेश भक्तांकरीता पासेस देण्याची व्यवस्था सर्व विभागीय वाहतुक कार्यालयामध्ये (सकाळी ०८.०० ते रात्रौ ०८.००) तसेच नियंत्रण कक्ष वाहतुक शाखा (२४ तास), पिंपरी चिंचवड येथे करण्यात आलेली आहे. पास प्राप्त करण्याकरणेकरीता वाहन चालकाने वाहन चालक परवाना आणि वाहन नोंदणी पुस्तक / स्मार्ट कार्ड यांची छायाकित प्रत संबंधीत प्रभारी अधिका-यांकडे सादर करावी. आपल्या नजीकच्या वाहतुक विभाग कार्यालयाच्या माहितीकरीता मोबाईल क्रमांक ९५२९६८१०७८ (मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतुक शाखा, पिंपरी चिंचवड) यावर संपर्क करावा असे आवाहन डॉ शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२३ १०:४८:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: