रविवारी रंगणार मेघ मल्हार संगीत महोत्सव
पिंपरी : नृत्यकला मंदिर तर्फे संचालिका तेजश्री अडीगे यांच्या पुढाकारातून मेघ मल्हार संगीत महोत्सव निगडी प्राधिकरण येथील ग दि माडगूळकर सभागृहात रविवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता होणार आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना उर्मिला कानेटकर यांना अश्विनी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष आहे. या कार्यक्रमात कथक नृत्यासह सुरेल शास्त्रीय गायन आणि वादनाची आनंदी मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तबलावादक तालऋषी पंडित अनिंदो चटर्जी (कोलकाता) तसेच उपस्थित पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त शेखर सिंह, कमला एज्युकेशन सोसायटी आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट चिंचवडचे सर्वेसर्वा लायन डॉ दीपक शहा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते पंडित डॉ. नंदकिशोर कपोते असतील.
अभिनेत्री उर्मिला कानिटकर कथक नृत्य सादर करणार आहे. यावेळी तबला साथ पंडित कालिनाथ मिश्रा, वोकल वैभव मांडकर, सितार अल्ताफ खान हे साथ देणार आहेत. जगविख्यात गायिका पंडिता आरती अंकलीकर टिकेकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियम अभिनय रावंडे, तबला प्रशांत तांडव हे साथ देतील. सरोद वादन नितीश पुरोहित, तबला पंडित समीर सूर्यवंशी यांची जुगलबंदी उपस्थितांना अनुभवता येणार आहे.
शहरातील आणि शहराबाहेरील शास्त्रीय संगीत, नृत्य क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांना हा कार्यक्रम बघता यावा. दिग्गज कलाकार अनुभवायला मिळावेत, यासाठी या कार्यक्रमाचे सन 2010 पासून आयोजन केले जात आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
अश्विनी पुरस्काराबद्दलशास्त्रीय नृत्या बरोबरच अभिनयाच्या विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या अभिनेत्रींचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. यापूर्वी शास्त्रीय नृत्यातील योगदानाकरिता शर्वरी जमिनीस आणि सुकन्या कुलकर्णी मोने या अभिनेत्रींना नृत्य कला मंदिरच्या वतीने अश्विनी पुरस्कार देण्यात आला आहे. प्रख्यात अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. नृत्य कला मंदिरच्या वतीने सन 2010 पासून दरवर्षी मेघ मल्हार संगीत महोत्सव आयोजित केला जातो. संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संचालिका तेजश्री अडीगे यांनी अश्विनी एकबोटे यांच्या स्मृती जागविण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून अभिनेत्री, नृत्यांगना उर्मिला कानेटकर यांना यावर्षीचा अश्विनी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शाल, श्रीफळ, रोख रक्कम 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अभिनेत्री, नृत्यांगना उर्मिला कानिटकर यांचा अश्विनी पुरस्काराने होणार सन्मान
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२३ १२:१७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०१/२०२३ १२:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: