पिंपरी : राजकारणी आणि प्रसिद्धीलोलुपता तसेच पत्रकारिता आणि लांगुलचालन यांचे यांचे अतूट नाते आहे. राजकारणी पत्रकारांना जगवतात. आणि पत्रकार त्यांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांचा उदोउदो करत असतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. दोन्ही बाजूंची अगतिकता याला कारणीभूत आहे. राजकारण्यांना प्रसिद्धी हवी असते आणि पत्रकारांना पोटाची खळगी भरायची असते. पण यातून यातून कधीकधी दारूण विनोद ( हो, बरोबर वाचलेत) दारूण विनोदच! निर्माण होतात. सध्या पिंपरी चिंचवड परिसरातही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही राजकारण्यांच्या बातम्या माध्यमांकडे येतात त्यात बातमी ’त्या’ नेत्याची आणि त्याची आपल्याच बातमीवर प्रतिक्रिया असा ’दारूण विनोदी’ प्रकार नेहमी असतो. यामुळे त्या राजकारण्यांचे सध्या हसे होत आहे. बातम्या लिहून देणारे पगारी चाकर आपल्या अन्नदात्याची वारेमाप प्रशंसा करून आपल्या ताटात चार शिते अधिक कशी पडतील हे पाहत असतात. पण, अन्नदात्याला तारतम्य हवे. आपले असे अशा प्रकारामुळे हसे होत असेल तर ते थांबव असे सांगण्याची इच्छाशक्ती बाळगायला हवी.
तूर्तास एव्हढेच...
'बातमी नको पण क्वोट आवर' असे म्हणण्याची पिंपरी चिंचवडमधील पत्रकारांवर पाळी (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२३ १२:४०:०० PM
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: