भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'कृष्णार्पणम ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम रविवार, ३ सप्टेबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे. कृष्णजन्माष्टमीचे औचित्य साधून ' नृत्याचे सादरीकरण होणार आहे. शिवांजली डान्स अॅकॅडमी तर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे. समृद्धी चव्हाण( कथक), नेहा आपटे(भरतनाटयम),ऋतुजा मारणे( भरतनाट्यम) तसेच शिवांजली डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७९ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२३ ०१:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: