ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
रत्नागिरी : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आजच्या सद्भावना दिवसानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी सर्वांना शपथ दिली.
“मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश,धर्म, प्रदेश किंवा भाषा विषय भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्या मध्ये सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवीन.”
यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी निशा कांबळे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी हणमंत म्हेत्रे, तहसीलदार ज्योती वाघ, तेजस्विनी पाटील आदींसह अन्य शाखांमधील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ ०१:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: