पुणे : भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज(एरंडवणे) येथे रॅगिंग विरोधी कायद्याच्या जनजागृतीसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकील ऍड.पुष्कर पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
भारती विद्यापीठाच्या विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे, उपप्राचार्य ज्योती धर्म आदी मान्यवर उपस्थित होते.पुष्कर पाटील यांनी रॅगिंग विरोधी कायद्याचा तपशील सांगितला आणि उदाहरणांसहित सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडून आणण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाबद्दलही चर्चा करण्यात आली.न्यू लॉ कॉलेजच्या अँटी रॅगिंग विभागाच्या वतीने डॉ.जयश्री खंदारे आणि करिष्मा पाटील यांनी संयोजन केले.नुकताच हा कार्यक्रम एरंडवणे कॅम्पस येथे पार पडला.
Reviewed by ANN news network
on
८/१८/२०२३ ०१:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: