भाजपा जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

 



 

मुंबई : भारतीय जनता पार्टी प्रदेश जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि  श्रीमती अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला. जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधीजैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारीविकास अच्छा हेही यावेळी उपस्थित होते. 

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अभियान कौतुकास्पद असून जैन प्रकोष्ठच्या अभियानामागे भाजपाची संपूर्ण संघटना उभी असल्याची ग्वाही दिली. गोरगरीब वर्ग वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी मोदी सरकारने तसेच राज्य सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत.  या अभियानाप्रमाणे जनजागृती झाली तर केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना यशस्वी होतील असेही त्यांनी नमूद केले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष  श्री. बावनकुळे यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

श्रीमती अमृता फडणवीस यांनी सांगितले कीकर्करोग होऊ नये यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. त्यासाठी जैन प्रकोष्ठ ने प्रबोधन करावे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० हजार तपासण्यांचे उद्दिष्ट जैन प्रकोष्ठच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करावेअसेही त्यांनी सांगितले. जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी यांनी सांगितले कीपहिल्या टप्प्यात १७५ तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतून २८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली.  या अभियानासाठी सहाय्य करणाऱ्या जश वीरागिरीश पारख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत आहे.

भाजपा जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ भाजपा जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ Reviewed by ANN news network on ८/२२/२०२३ ०५:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".