दिलीप शिंदे
सोयगाव : दरोड्यांच्या प्रयत्नात सोयगाव तालुक्यात आलेल्या अट्टल आरोपीला सोयगाव पोलिसांनी शनिवारी (दि.२६) रात्री तीन वाजता वीस मिनिटे पाठलाग करून वरठाण येथील चौफुलीवर पकडून अटक केली आहे दरम्यान त्याच्याजवळ लोखंडी रॉड बाळगून हा अट्टल गुन्हेगार छत्रपती संभाजीनगर शहरात विविध गुन्हे करून फरारी असल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे. मुकेश किसन खोडके(वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्यास रविवारी सोयगाव न्यायालयात हजर केले असता त्याची हर्सूलच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे
सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्यासह कर्मचारी सरकारी वाहनाने रात्रीच्या गस्तीवर होते वरठाण परिसरात पोलीस वाहन असताना त्यांना वाहनांच्या प्रकाशात एक इसम संशयित रित्या आढळून आला त्याचे मागे जीप लावली असता तो पळून जात असल्याने पोलीस निरीक्षक अनमोल केदार, अजय कोळी, रवींद्र तायडे आदींनी त्याचा वरठाण परिसरात वीस मिनिटे पाठलाग करून त्यास अखेर वरठाण चौफुलीवर पकडले त्यास सोयगाव पोलीस ठाण्यात घेवून आले असता त्याचे अंगझडतीत एक लोखंडी रॉड आढळून आला त्याची अधिक चौकशी केली असता त्यांचेवर छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीत २५ विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे हा आरोपी सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यांसारखा गुन्हा करण्यासाठी आल्या ची खात्री झाल्यावर सोयगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम १२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे रविवारी त्यास सोयगाव न्यायालयाने हरसुलच्या कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनमोल केदार अजय कोळी, रवींद्र तायडे संदीप सुसर आदींच्या पथकांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: