कै. बाबुरावजी काळे यांनी सामान्य शेतकऱ्यांना सहकारी बँकेचे कर्ज उपलब्ध करून देत खाजगी सावकराच्या जाचातून सुटका केली : द्वारकाभाऊ पाथ्रीकर
दिलीप शिंदे
सोयगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै. बाबुरावजी काळे यांनी 1980 च्या दशकात सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत सावकराच्या जाचातून मुक्त करण्याचे काम केले. त्याकाळात खाजगी सावकार सोडून सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नव्हते. परंतु काळे यांनी शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज उपलब्ध करून दिले. असे मत औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कै. बाबुरावजी काळे यांच्या सोबत काम केलेले द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी मांडले. ते अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कै. बाबुरावजी काळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी औरंगाबाद येथील प्रसिद्ध वकील इकबाल गिल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार, जिल्हा परिषद सदस्या सौ पुष्पाताई काळे, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, प्राचार्य डॉ राजेश यादव, सोयगाव नगर पंचायत अध्यक्ष आशाताई तडवी, श्री इंद्रजित सोळंके, श्री रवींद्र काळे, डॉ उल्हास पाटील, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर एलिस आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कै बाबुरावजी काळे यांचे कार्य कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले. त्यानंतर प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करियर कट्टा उपक्रमा अंतर्गत करीयर संसदेचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख व संयोजक डॉ दिलीप बिरुटे यांनी केले तर आभार डॉ रामेश औताडे यांनी मानले. शेवटी प्राचार्य डॉ शिरिष पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी डॉ दिलीप बिरुटे, डॉ रमेश औताडे, डॉ पी एन डापके, प्रा ज्योती स्वामी, डॉ लक्ष्मीनारायण कुरपटवार आदीनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
८/२७/२०२३ ०८:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: