"एआय साक्षर होण्यासाठी सज्ज व्हा; जग पादाक्रांत करा" : राज्यपाल बैस यांचे आवाहन

 


 


डॉडीवायपाटील विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात

अरुण फिरोदियाप्रमोद चौधरीडॉराजदान यांना मानद डॉक्टरेट

 

पिंपरी :"आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआयआणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे निश्चित आहेआता केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. 'एआयसाक्षर होणे आवश्यक आहेशिक्षणआरोग्यसेवा क्षेत्रात एआय महत्वाची भूमिका निभावणार आहेमात्र मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहेएआयकडे सहानुभूती नसतेमाणसाकडे आहेएआय प्रेम भाव जाणत नाहीमाणूस जाणतोयाच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू शकतोआपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल," असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी व्यक्त केलानव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोतयाचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजेजे कुठले कामनोकरी करत असू त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजेसंपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजेप्रत्येक तरूणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजेस्वतःला केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित  ठेवता देशाच्याजगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजेअसे आवाहन श्रीबैस यांनी केले.

 

डॉडीवाय पाटील (अभिमतविद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे श्री बैस बोलत होतेया सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष श्री अरुण फिरोदियाप्राज इंडस्ट्रिज लिमिडेटचे कार्यकारी अध्यक्ष डॉप्रमोद चौधरी आणि क्वालिटी ॲश्युरन्स ॲंड एक्सलन्स सेलरामय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सबंगळुरूचे प्रमुख सल्लागार डॉपीएनराजदान यांना मानद 'डॉक्टर ऑफ सायन्सही पदवी प्रदान करण्यात आलीडॉडीवायपाटील विद्यापीठाचेकुलपती डॉपीडीपाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होतेप्र-कुलपती डॉभाग्यश्रीताई पाटीलकुलगुरू डॉएनजेपवारसचिव डॉसोमनाथ पाटीलविश्वस्त  संचालिका डॉस्मिता जाधवविश्वस्त  खजिनदार डॉयशराज पाटील यांच्यासह देशभरातून आलेले विद्यार्थीपालक आणि प्राध्यापक पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात सोमवारी (दि. 14 ऑगस्टसकाळी झालेल्या या सोहळ्यास उपस्थित होते

 

राज्यपाल श्री बैस म्हणाले, "येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतातअसा मॅकेन्झीचा अहवाल सांगतोयातल्या ३७. कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णतः बदलावी लागेलएकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईलविद्यापीठांना माझा आग्रह असेल की आपल्या शिक्षण व्यवस्थेत एआय आणि मशिन लर्निंगचा समावेश करण्यावर चिंतन झाले पाहिजेया व्यवस्थेचा लाभ उठवण्यासाठी रणनिती आखावी लागेलएआयमुळे शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत."

 

मी आपल्याला सावध करू इच्छितो की एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोतचांगली गोष्ट ही आहे की भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतातनव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतातएआयच्या आगामी युगात आपल्याला निरंतर शिकत राहावे लागेलप्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला 'स्किलरिस्किलअपस्किलच्या माध्यमातून तयार व्हावे लागेलअसे प्रतिपादन श्री बैस यांनी केले.

 

डॉडीवायपाटील विद्यापीठाचे कुलपती डॉपीडीपाटील यांनी सांगितले, "शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत डॉडीवायपाटील विद्यापीठ तडजोड करत नाहीत्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी .६४ गुण विद्यापीठाला मिळाला असून  प्लस-प्लस दर्जा प्राप्त झाला आहेमिळालाकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्कच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार विद्यापीठाच्या दंतवैद्यकशास्त्र महाविद्यालयाला देशात तिसरा क्रमांक मिळालावैद्यकीय महाविद्यालयाने देशात एकविसाव्या क्रमांकावरून पंधराव्या स्थानावर झेप घेतली तर विद्यापीठ गटात ४६ वा क्रमांक मिळाला आहे."

 

अरुण फिरोदिया म्हणाले, "येथून बाहेर पडल्यानंतर 'जॉब गिव्हर्सव्हा, 'जॉब टेकर्सनकोएक बिलियन डॉलर्स मूल्य असणारे शंभर स्टार्टअप्स देशात सुरू झाले आहेतभारताची प्रचंड लोकसंख्या ही समस्या नसून वरदान आहेयातून 'इकॉनॉमी ऑफ स्केलशक्य आहेतंत्रज्ञान आणि निर्यात यातून देशाची प्रगती होईलतुम्ही आत्मविश्वासाने देशाला पुढे घेऊन जा."

 

"ही डॉक्टरेट पदवी माझ्यासाठी मैलाचा दगड आहेजागतिक बायोइकॉनॉमी क्षेत्रातील माझ्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल विद्यापीठाचे मी आभार मानतो," असे प्रमोद चौधरी म्हणालेत्यांनी सांगितले कीहवामान बदल हा मानवी अस्तित्वासाठी धोका ठरत आहेभारताकडे बायोमास आणि शेतमालाचे अवशेष यांचे प्रमाण खूप मोठे आहेयातून बायोफ्युएलबायोकेमिकल यांची निर्मिती शक्य आहेयातून देशाला इंधन सुरक्षा लाभणार असून पर्यावरणपूरक शाश्वत विकास साधता येणार आहे.

 

डॉपीएनराजदान म्हणाले, "जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहेया अंतर्गत लिथियमचा . दशलक्ष टन साठा शोधण्यात यश आले आहेयातून प्रचंड आर्थिक विकास होणार आहेसन २००० मध्ये हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा त्यात सहभागी होण्याची संधी मलाही मिळाली होती." देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावत आहेआपली पिढी गुणवान असून त्यांना घडविण्यासाठी विद्यापीठांना अधिक सक्षम व्हावे लागेल.

 

 

चौकट

३३ सुवर्णपदके आणि १४ पी.एचडी.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आलेविविध विद्याशाखेतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आलीयामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 3015 पदव्युत्तर पदवी, 1055 पदवी  11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

चौकट

प्रत्यारोपणाच्या ३०० शस्त्रक्रिया

 

"डॉडीवायपाटील विद्यापीठाने (पिंपरीगेल्या दोन दशकांत देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घातली आहेमेडिकलदंतवैद्यक शास्त्रनर्सिंगफिजिओथेरपीबायोटेकआयुर्वेदहोमिओपॅथीमॅनेजमेंट आदी विद्याशाखांना नॅक  एनआयआरएफ रँकिंगमध्ये सातत्याने उच्चश्रेणी प्राप्त झाली आहेनव्या शैक्षणिक धोरणाला (एनईपीअनुकूल अभ्यासक्रम राबविण्याची सुरुवात विद्यापीठाने केली आहेतसेचडीवायपाटील हॉस्पिटलने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये संपूर्ण देशात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहेहृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, नेत्रपटल प्रत्यारोपणाच्या तब्बल तीनशेहून अधिक  शस्त्रक्रिया हॉस्पिटलने गेल्या तीन-चार वर्षात यशस्वीपणे केल्या आहेत."

 

-डॉपीडीपाटीलकुलपतीडॉडीवायपाटील विद्यापीठ

"एआय साक्षर होण्यासाठी सज्ज व्हा; जग पादाक्रांत करा" : राज्यपाल बैस यांचे आवाहन "एआय साक्षर होण्यासाठी सज्ज व्हा; जग पादाक्रांत करा" : राज्यपाल बैस यांचे आवाहन Reviewed by ANN news network on ८/१४/२०२३ ०८:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".