आयुक्त विनय कुमार चौबे यांचे केले अभिनंदन
पिंपरी :पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांचेे अभिनंदन केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे की, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आपल्या शहराच्या आयुक्तांना हा सन्मान प्राप्त होत असल्याने ही बाब शहरासाठीही अभिमानास्पद आहे. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त या नात्याने विनय कुमार चौबे यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जागरुकपणे प्रयत्न केले. गैरकृत्यांवर वचक निर्माण करताना सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचा संवाद निर्माण केला.
तसेच, शहरातील पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना विश्वासात घेऊन पोलिस दलाला जास्तीत जास्त जनताभिमुख करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरु असतात. त्या प्रयत्नांसह त्यांच्या पुढील कारकिर्दीला या सन्मानाने निश्चित बळ मिळणार आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मान होणे ही कोणत्याही पोलिस अधिकार्यासाठी अत्यंत सन्मानाची, आनंदाची बाब. तो सन्मान, आनंद पोलिस आयुक्त चौबे यांना लाभला आहे. पोलिस दलात त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीबद्दल त्यांना हा गौरव प्राप्त होत आहे. यापुढील काळातही त्यांच्याकडून अशाच प्रकारची कर्तबगारी पार पडून जनतेला दिलासा देणारे कार्य घडावे, अशीही अपेक्षा जगताप यांनी व्यक्त करुन पोेलिस आयुक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२३ ०७:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: