पुणे : 'चांद्रयान मोहिमेचे भारताचे यश अतुलनीय असून प्रगत देशांच्या श्रेणीत भारत जाऊन बसला आहे.भारताचे शास्त्रज्ञ,इस्त्रो सारख्या संस्था आणि पं.नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांना हे श्रेय जाते.एक भारतीय म्हणून सर्वांना हा अभिमानाचा क्षण आहे.अनेक दशकांची मेहनत,संशोधन फळास आले आहे.विज्ञान आणि संशोधनाला या यशामुळे प्रेरणा मिळेल.शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन,विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधनाला प्राधान्य देणे सर्वांगीण प्रगतीसाठी हितकारक ठरेल',अशी प्रतिक्रिया 'डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ पी ए इनामदार यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.दरम्यान,चांद्रयानाच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण आझम कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
चांद्रयान मोहिमेचे यश अतुलनीय :डॉ पी ए इनामदार
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२३ १०:१९:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२३ १०:१९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: