चित्ररसिकांचा चांगला प्रतिसाद ,२७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली
३५ कलाकारांच्या शंभर कलाकृतींचा समावेश
पुणे : चित्ररसिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे 'पुणे आर्टिस्ट ग्रुप'च्या 'पॅ लेट -३५ ' या पावसाळी समूह प्रदर्शनाची मुदत २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. हे चित्र प्रदर्शन राजा रविवर्मा आर्ट गॅलरी,(नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता ) येथे आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले असणार आहे.चित्र प्रदर्शनामध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील ३५ कलाकारांनी सहभाग घेतला आहे. विविध विषयांवरील रचनाचित्र, निसर्ग चित्र, अमूर्त चित्र ,विणकाम मधील चित्र, त्रिमित चित्र, अध्यात्मिक चित्र अशा विविध विषयांवरील शंभर कलाकृती कलारसिकांना पाहता येणार आहेत . प्रदर्शनाचे नियोजन 'पुणे आर्टिस्ट ग्रुप'चे चित्रकार सुरेंद्र कुडपणे यांनी केले आहे.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.त्यानंतर विविध मान्यवरांनी चित्र प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे अशा अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आणि प्रदर्शनाचा आनंद घेतला
'पुणे आर्टिस्ट ग्रुप' च्या पावसाळी चित्रप्रदर्शनाला मुदतवाढ
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२३ १२:१६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२३ १२:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: